...अन्यथा कारखाने सुरू करू देणार नाही

By admin | Published: August 6, 2015 11:56 PM2015-08-06T23:56:27+5:302015-08-06T23:56:27+5:30

रघुनाथदादा पाटील : उत्पादन खर्चावर आधारित दर देण्याची मागणी

... otherwise the factory will not let you start | ...अन्यथा कारखाने सुरू करू देणार नाही

...अन्यथा कारखाने सुरू करू देणार नाही

Next

कोल्हापूर : साखरेवर आधारित दर देण्याचा प्रकार शेतकरी विरोधातील षङ्यंत्र आहे. उत्पादन खर्चावर आधारित दर मिळालाच पाहिजे. या पद्धतीने दर मिळाला नाही, तर आगामी हंगामात साखर कारखाने सुरू करू न देण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेद्वारे दिला.
रघुनाथदादा पाटील म्हणाले, केंद्र सरकारने जे ऊस दराबाबतचे पॅकेज जाहीर केले. याबाबत शेतकरी, संघटना समाधानी नाही. अजून दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले पाहिजे. शिवाय ‘एफआरपी’देखील चुकीचा काढला असून, तो दुरुस्त व्हायला हवा. ‘एसएमपी’ ऐवजी ‘एफआरपी’वर देण्याचा घाट शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे. ‘एफआरपी’मध्ये दर देण्याचे फारसे बंधन राहिलेले नाही. शिवाय यातून उपपदार्थांवरील ५० टक्के नफा शेतकऱ्यांना देण्याची अट शिथील झाली आहे. एफआरपीमधून ही अट काढून टाकताना महाराष्ट्रातील नेते, खासदार चिडीचूप बसले. त्यांनी याद्वारे संगनमताने शेतकऱ्यांना लुटले आहे. ही अट शिथील झाल्याने ते शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. मात्र, उलट खासगी कारखान्यांचे पेव वाढले आहे. शेतकरी हितासाठी ३५०० रुपये एफआरपी दिला पाहिजे. उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला पाहिजे. या पद्धतीने दर मिळाला नाही, तर आगामी हंगामात कारखाने सुरू करू देणार नाही. उसाच्या माध्यमातून सरकारला २५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न कराच्या माध्यमातून मिळते. पत्रकार परिषदेस पी. जी. पाटील, अजित पाटील, आदी उपस्थित होते.

मूठभर लोकांसाठी सरकारने गुडघे टेकले
पोर्नसाईटवरील बंदी आवश्यक असताना सरकारने ती का उठविली, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, आजच्या पिढीला लागणारे वाईट वळण टाळण्यासाठी पोर्नसाईटवरील बंदी महत्त्वाची होती. मात्र, काही मूठभर लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलेल्या दबावापुढे सरकारने बंदी उठवून गुडघे टेकले. अशा साईटवर सरकारने बंदी ठेवावी.

Web Title: ... otherwise the factory will not let you start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.