खळबळजनक!..अन्यथा वेश्या व्यवसायास भाग पाडू, कोल्हापुरात कर्जाच्या वसुलीसाठी खासगी सावकाराने दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 01:37 PM2023-01-30T13:37:42+5:302023-01-30T13:44:51+5:30

याप्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार दाखल नाही

Otherwise forced to engage in prostitution, A private lender in Kolhapur threatened to recover the loan | खळबळजनक!..अन्यथा वेश्या व्यवसायास भाग पाडू, कोल्हापुरात कर्जाच्या वसुलीसाठी खासगी सावकाराने दिली धमकी

खळबळजनक!..अन्यथा वेश्या व्यवसायास भाग पाडू, कोल्हापुरात कर्जाच्या वसुलीसाठी खासगी सावकाराने दिली धमकी

googlenewsNext

उद्धव गोडसे

कोल्हापूर : घरबांधणीसाठी घेतलेल्या २५ लाख रुपयांच्या कर्जापोटी तब्बल ८५ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील खासगी सावकाराकडून सुरू आहे. कर्जाच्या वसुलीसाठी घरात गुंड पाठवून धमकावले जात आहे. तसेच कर्जाची परतफेड केली नाही तर घरातील महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडू, अशी धमकीही या सावकाराने दिल्याचे पीडित महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या धक्कादायक प्रकाराने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार दाखल झाली नाही.

शहरालगत असलेल्या वडणगे (ता. करवीर) येथील एका कुटुंबाने नवीन घर बांधणीसाठी खासगी सावकाराकडून २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. आता व्याजासहित ८५ लाख रुपयांची परतफेड करावी, असा तगादा खासगी सावकाराकडून सुरू आहे. खासगी सावकाराने संबंधित कर्जदाराची कार बळजबरीने ओढून नेली आहे. तसेच घरही बळकावण्याची धमकी दिली आहे.

वेळेत कर्जाची परतफेड न केल्यास घरातील महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडू, असे धमकावल्याचे पीडित महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रकरणी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे तक्रार देणार असल्याचेही सांगितले.

Web Title: Otherwise forced to engage in prostitution, A private lender in Kolhapur threatened to recover the loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.