...अन्यथा भाजप कार्यालयाला टाळे ठोकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:28+5:302021-07-16T04:17:28+5:30

कोल्हापूर : ई.पी.एस.-९५ पेन्शनरांच्या वाढीव पेन्शनसंदर्भातील मागण्यांन भाजप सरकारने बेदखल केल्याच्या निषेर्धात गुरुवारी ऑल इंडिया ऑर्डिनेशन कमिटी ऑफ ईपीएफ ...

... otherwise I will lock the BJP office | ...अन्यथा भाजप कार्यालयाला टाळे ठोकू

...अन्यथा भाजप कार्यालयाला टाळे ठोकू

Next

कोल्हापूर : ई.पी.एस.-९५ पेन्शनरांच्या वाढीव पेन्शनसंदर्भातील मागण्यांन भाजप सरकारने बेदखल केल्याच्या निषेर्धात गुरुवारी ऑल इंडिया ऑर्डिनेशन कमिटी ऑफ ईपीएफ पेन्शनर्स असोसिएशनचे भाजपच्या बिंदू चौकातील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन आयोजित केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन स्थगित करून निवेदन देण्यात आले. त्यात लवकर निर्णय न झाल्यास पक्षाच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

केंद्रातील भाजप सरकारने गेली सात वर्षे पेन्शनरांच्या मागण्यांना बेदखल केले आहे. यांच्या निषेर्धात गुरुवारी राज्यभरात भाजप जिल्हा कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन आयोजित केले होते. मात्र, वाढत्या कोराेनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, शिष्टमंडळ जाऊन भाजप पदाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागण्यांचा पाठपुरावा करण्यास सांगण्यात आले. या मागण्या येत्या काही दिवसांत पूर्ण झाल्या नाही तर कोरोनाचा कहर संपल्यानंतर जिल्ह्यातील पाच हजार पेन्शनर एकत्र येऊन भाजप कार्यालयाला टाळे ठोकतील, असा इशारा दिला. यावेळी असोसिएशनचे सचिव आप्पा कुलकर्णी, धोंडिबा कुंभार, शांताराम पाटील, कृष्णात चौगुले, तुकाराम तळप, भाऊ पाटील, आदी उपस्थित होते. तत्पूर्वी लक्ष्मीपुरीतील सर्व श्रमिक संघामध्ये झालेल्या बैठकीत अतुल दिघे यांनी पेन्शनरांना मार्गदर्शन केले.

Web Title: ... otherwise I will lock the BJP office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.