...अन्यथा १ एप्रिलपासून ‘एलबीटी’ भरणार नाही
By admin | Published: March 26, 2015 12:29 AM2015-03-26T00:29:45+5:302015-03-26T00:37:37+5:30
दंड, व्याज रद्द करा : ठाण्यातील ‘फाम’च्या बैठकीत निर्णय
कोल्हापूर : राज्य सरकारने आतापर्यंतचा ‘एलबीटी’चा दंड व व्याज रद्द करावे, त्याचबरोबर १ मेपासून ‘एलबीटी’ रद्द करून व्हॅट सुुरू
करावा, या मागण्यांची पूर्तता न झाल्यास १ एप्रिलपासून राज्यातील व्यापारी ‘एलबीटी’ भरणार नाहीत, असा इशारा फेडरेशन आॅफ असोसिएशन महाराष्ट्र (फाम)च्या बुधवारी ठाणे येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला.
ठाणे इंडस्ट्रीयल इस्टेट येथे दुपारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरुनानी होते. बैठकीत ‘एलबीटी’ संदर्भात चर्चा होऊन विविध निर्णय झाले. त्यामध्ये आतापर्यंतचा ‘एलबीटी’चा दंड आणि व्याज रद्द करावे, त्याचबरोबर १ मेपासून ‘एलबीटी’ रद्द करून व्हॅट सुरू करावा.
या मागण्यांची पूर्तता न
झाल्यास १ एप्रिलपासून राज्यातील व्यापारी ‘एलबीटी’ भरणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर सांगली येथील व्यापाऱ्यांवर महापालिकेने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ उद्यापासून बेमुदत आंदोलन सुरू करणार आहे. ‘फाम’ने पाठिंबा जाहीर केला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज, गुरुवारी मोहन गुरुनानी सांगलीत येणार आहेत.
या बैठकीला कोल्हापूर जिल्हा उद्योजक महासंघाचे अध्यक्ष
सदानंद कोरगावकर, अमर क्षीरसागर,
श्रेणिक चिंदगे, राजीव राठी,
प्रभाकर वणकुद्रे, प्रफुल्ल संचेती यांच्यासह राज्यातील अनेक व्यापारी
प्रतिनिधी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)