अन्यथा आंदोलन छेडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:26 AM2021-04-07T04:26:43+5:302021-04-07T04:26:43+5:30
शिरोळ : अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रकर ॲपवर काम करणे अशक्य आहे. तो ॲप रद्द करा यासह विविध मागण्यांप्रश्नी ...
शिरोळ :
अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रकर ॲपवर काम करणे अशक्य आहे. तो ॲप रद्द करा यासह विविध मागण्यांप्रश्नी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना निवेदन दिले.
शिरोळ गटविकास अधिकारी कवितके यांच्यासमोर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन प्रमुख आप्पा पाटील यांनी विविध प्रश्नावर चर्चा केली. पाटील म्हणाले, अंगणवाडी सेविका मोबाईल तसेच रजिस्टरवरून अहवाल माहिती देत असताना नव्याने देण्यात आलेल्या पोषण ट्रॅकर ॲपमुळे अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे हा ॲप रद्द करावा. तर अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे प्रवास भत्ते, प्रोत्साहन भत्ते वेळेत मिळत नाहीत.याबाबत कार्यवाही करावी .
पोषण ट्रॅकरबाबत जिल्हा प्रशासनाला कळवू असे आश्वासन गटविकास अधिकारी कवितके यांनी शिष्टमंडळाला दिले.मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिष्टमंडळाने यावेळी दिला.
यावेळी शोभा भंडारे,सरिता कंदले, मंगल गायकवाड, सुनंदा कुऱ्हाडे, दिलशाद नदाफ, पुष्पा वाळके, विद्या कांबळे,शहापुरे, शमा पठाण, निर्मला पाटील आदी उपस्थित होते.