Maratha Reservation Kolhapur : अन्यथा... लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही, कोल्हापुरातील मराठा संघटनांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 07:21 PM2021-06-03T19:21:55+5:302021-06-03T19:23:48+5:30
Maratha Reservation Kolhapur : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी कोल्हापुरातील विविध मराठा संघटनांनी गुरुवारी नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळी आत्मक्लेश आंदोलन केले. आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन मराठा समाजाला लोकप्रतिनिधींनी न्याय द्यावा, अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी या वेळी दिला.
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी कोल्हापुरातील विविध मराठा संघटनांनी गुरुवारी नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळी आत्मक्लेश आंदोलन केले. आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन मराठा समाजाला लोकप्रतिनिधींनी न्याय द्यावा, अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी या वेळी दिला.
या समाधिस्थळी सकाळी सव्वादहाच्या सुमारास विविध मराठा संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. त्यात भगवे स्कार्फ, टोपी घालून आणि भगवे ध्वज हातात घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले. मराठा समाज गेल्या ६० वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत आहे; पण राज्यकर्त्यांची आरक्षण देण्याची मानसिकता नाही. इतर समाजाची व्होट बँक सांभाळण्यासाठी ते मराठा समाजाला आरक्षण नाकारत आहेत. ते आता मराठा समाज खपवून घेणार नाही.
कोरोनामुळे आम्ही आज शांततेत आत्मक्लेश आंदोलन केले. यापुढे आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल. आरक्षणाबाबतच्या खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असणार आहे, असे बाळ घाटगे यांनी सांगितले. आंदोलनात चंद्रकांत पाटील, मारूतराव कातवरे, आर. के. पोवार, बाबा महाडिक, संपतराव पाटील, सुनीता पाटील, गीता हासूरकर, यशदा सरनाईक, लता जगताप, छाया जाधव, शारदा पाटील, सुषमा डांगरे, गौरी मोहिते, मीना तिवले, लता सासने, राजू सावंत, रमेश मोरे, सी. एम. गायकवाड, फत्तेसिंह सावंत, दीपक घोडके, जयदीप शेळके, मदन पाटील, उदय लाड, राहुल इंगवले, राजू भोसले, राजेश वरक, अजित दळवी आदी सहभागी झाले.