...अन्यथा दंडाची पावती थेट घरात येणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:13 AM2021-02-05T07:13:01+5:302021-02-05T07:13:01+5:30

कोल्हापूर : शहरातील विविध मार्गांवर वेगमर्यादा न पाळल्यास वाहनधारकांना थेट दंडाला सामोरे जावे लागणार आहे. अशा मर्यादा न पाळणाऱ्या ...

... otherwise the receipt of the fine will come directly to the house! | ...अन्यथा दंडाची पावती थेट घरात येणार !

...अन्यथा दंडाची पावती थेट घरात येणार !

Next

कोल्हापूर : शहरातील विविध मार्गांवर वेगमर्यादा न पाळल्यास वाहनधारकांना थेट दंडाला सामोरे जावे लागणार आहे. अशा मर्यादा न पाळणाऱ्या वाहनधारकांना दंडाची पावती थेट घरात पोहोचविण्याची व्यवस्था शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी आपली वाहने शिस्तीनेच चालविणे बंधनकारक झाले आहे.

गेले काही दिवस सायबर काॅलेज ते शाहू टोलनाका या मार्गावर ३० ते ६० कि.मी. प्रतितास या वेगाने आपले वाहन चालविणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. याशिवाय कसबा बावडा ते शिये या मार्गावरही आपले वाहन ७० कि.मी. प्रतितास या वेगापेक्षा अधिक वेगाने चालविल्यास त्या वाहनधारकालाही एक हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. नेहमी गजबजलेल्या दाभोळकर काॅर्नर येथील सिग्नलवरील झेब्रा क्राॅसिंगवर जर एखादे वाहन उभे केले तर त्या वाहनधारकास दोनशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. अशा वाहनांचा शोध स्वयंचलित कॅमेऱ्यांद्वारे टिपलेल्या छायाचित्रांवरून केला जाणार आहे. दंडाची पावती थेट वाहनधारकांच्या घरात किंवा मोबाईलवर पोहोचविण्याची सोय शहर वाहंतूक शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. अशा पद्धतीचा संदेश सोशल मीडियावरून सर्वत्र फिरत होता. त्याची खातरजमा केल्यानंतर हा संदेश खरा असून आता वेगवान व बेदरकार वाहने चालविणाऱ्या वाहनधारकांना चाप बसणार आहे.

कोट

या मार्गावर उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे व स्पीडगन आणि रडार बसविण्यात आले आहेत. त्यातून मिळालेल्या सचित्र माहितीच्या आधारे ही कारवाई केली जाणार आहे.

- स्नेहा गिरी, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

Web Title: ... otherwise the receipt of the fine will come directly to the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.