अन्यथा कडक लॉकडाऊन अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:25 AM2021-04-20T04:25:11+5:302021-04-20T04:25:11+5:30
जयसिंगपूर : राज्यात लॉकडाऊन सुरू असतानाही रस्त्यावरील गर्दी पाहता कोरोनाबाबचे गांभीर्य जनतेने घेतलेले दिसत नाही. ब्रेक द चेनमधील या ...
जयसिंगपूर : राज्यात लॉकडाऊन सुरू असतानाही रस्त्यावरील गर्दी पाहता कोरोनाबाबचे गांभीर्य जनतेने घेतलेले दिसत नाही. ब्रेक द चेनमधील या निर्बंधांना जनतेने सहकार्य केले नाहीतर लवकरच कडक लॉकडाऊन अटळ असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
आरोग्य राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून ५० लाख रुपये खर्चाचे वैद्यकीय उपकरणे व साहित्याचे वाटप सोमवारी शिरोळ तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना करण्यात आले.
कार्यक्रमास पं. स. सभापती कविता चौगुले, उपसभापती राजगोंडा पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, डॉ. प्रसाद दातार, डॉ. प्रसन्न कुंभोजकर, डॉ. खांबे यांच्यासह पंचायत समिती सदस्य व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
-----------------
चौकट - प्राथमिक केंद्रांना सोनोग्रॉफी मशीन
कोरोनाबाधित रुग्णांच्याबाबत आरोग्य विभाग सजग आहे. संसर्ग वाढू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना लवकरच सोनोग्रॉफी मशीन उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांनी यावेळी सांगितले.
फोटो - १९०४२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - शिरोळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, डॉ. प्रसाद दातार, डॉ. प्रसन्न कुंभोजकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.