..अन्यथा वाहन जप्तीची कारवाई अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:22 AM2021-04-18T04:22:17+5:302021-04-18T04:22:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : संचारबंदीच्या काळात प्रशासनाने दोन दिवस नागरिकांना सहकार्याची भावना ठेवली होती. मात्र, अनेकजण गरज ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : संचारबंदीच्या काळात प्रशासनाने दोन दिवस नागरिकांना सहकार्याची भावना ठेवली होती. मात्र, अनेकजण गरज नसताना बाहेर फिरत असल्याचे चित्र पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाचे आलेले संकट थोपविण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्यांवर वाहन जप्तीची कारवाई अटळ आहे. राज्य शासनाने जी नियमावली घालून दिली आहे. त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये राज्य शासनाने काही निर्बंध लादले आहेत. कोल्हापूर शहरातही या संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, दोन दिवसांमध्ये प्रशासनाने सहकार्याची भावना ठेवून या संचारबंदीत काम केले. मात्र, शहरातील गर्दी कमी होत नसल्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम राबविली. यात एक लाख रुपयांचा दंड वसूल केला. आलेले संकट थोपविण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलावी लागत आहेत. त्यामुळे आता विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई अटळ असून, जे लोक विनाकारण फिरतील त्यांच्यावर वाहन जप्तीची कारवाई केली जाईल. कारण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने जी नियमावली घालून दिली आहे. त्याचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.