...अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:18+5:302021-06-24T04:17:18+5:30
मलकापूर : मालकी हक्काच्या जमिनीत सांडपाणी सोडून जमिनीचे नुकसान करण्याबरोबरच राजकीय हेतूने नाहक त्रास देत असलेल्या विरळे ग्रामपंचायतीची ...
मलकापूर : मालकी हक्काच्या जमिनीत सांडपाणी सोडून जमिनीचे नुकसान करण्याबरोबरच राजकीय हेतूने नाहक त्रास देत असलेल्या विरळे ग्रामपंचायतीची चौकशी करून आम्हाला तत्काळ न्याय द्या, अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा विरळे (ता. शाहूवाडी) येथील कमल ज्ञानदेव सावंत यांनी शाहुवाडीचे तहसीलदार गुरू बिराजदार यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, विरळे येथे माझ्या मालकी वहिवाटीची शेत जमीन गट नंबर ९० ही आहे. मात्र राजकीय द्वेषातून ग्रामपंचायतीने गावातील सांडपाण्याचे गटर काढून ते सर्व पाणी आमच्या शेतात सोडले आहे. सदर पाण्यामुळे माझ्या शेतीचे नुकसान होत आहे मी स्वतः स्वखुषीने दोन गुंठे क्षेत्र यापूर्वीच पाणंद रस्त्यासाठी दिले आहे. मात्र, तरीही जमीन देऊनसुद्धा माझे शेतात सांडपाणी सोडले आहे. सदरचे सांडपाणी माझ्या शेतात सोडण्यासाठी आमच्यावर सतत दबाव आणला जात आहे व लोकांना खोटे सांगून आमच्या विरोधात सह्या घेऊन अर्ज देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या घटनेमुळे आमच्या परिवारास मानसिक त्रास होत असून या प्रकरणी आपण योग्य ती चौकशी करून आम्हास न्याय द्यावा, अन्यथा आम्ही सहपरिवार आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशाराही कमल सावंत यांनी दिला आहे.