आमचे सरकार गेंड्याच्या कातडीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:29 AM2021-09-07T04:29:39+5:302021-09-07T04:29:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी: ‘आमचे सरकार हे गेंड्याच्या कातडीचे असल्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून, जोपर्यंत ...

Our government of rhinoceros skin | आमचे सरकार गेंड्याच्या कातडीचे

आमचे सरकार गेंड्याच्या कातडीचे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

गारगोटी: ‘आमचे सरकार हे गेंड्याच्या कातडीचे असल्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून, जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला भरपाई मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको, धरणे यासारखी आंदोलने करावी लागतील, त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही,’ असा घरचा आहेर माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिला.

ते गारगोटी येथे आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चात बोलत होते. पाटबंधारे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मेघोली लघुपाटबंधारे प्रकल्प फुटून एका महिलेसह अनेक मुक्या जनावरांच्या जिवासह शेकडो हेक्टर शेती पिकाच्या झालेल्या नुकसानभरपाईच्या मागणीसाठी भुदरगड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, प्रहार संघटना, शेतकरी संघटना, कम्युनिस्ट पार्टी, भुदरगड संघर्ष समिती, बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या वतीने आज सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चा भुदरगड तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चाला श्री इंजुबाई देवालय पासून सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले.

मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची शासनाने त्वरित भरपाई द्यावी. शेकडो एकर शेतजमिनीवरील झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी शासनाने त्वरित मदत द्यावी. बेकायदेशीररीत्या चौकीदाराची बदली करून मेघोली धरणाला सहा महिने वाऱ्यावर सोडणाऱ्या अभियंता स्मिता माने यांचे तत्काळ निलंबन करावे. चौकीदाराच्या बदलीसाठी अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकणाऱ्या राजकीय पुढाऱ्र्याचे नाव जाहीर करा. जलसंपदा विभागाचे बेजबाबदार अधिकारी महेश सुर्वे, स्मिता माने ,संभाजी भोपळे, सौमित्र शिर्के यांना तत्काळ निलंबित करा आदी मागण्या केल्या.

माजी जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल देसाई, गोकूळचे संचालक रणजितसिंह पाटील,प्रा बाळ देसाई, बिद्रीचे संचालक मधुकर देसाई, के. ना. पाटील, तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, प्रवीणसिंह सावंत, मच्छिंद्र मुगडे, युवराज येडुरे, सुनील कांबळे, सचिन घोरपडे, संग्राम देसाई, सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच राहुल कांबळे उपस्थित होते.

फोटो ओळ

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी या मागणीसाठी तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात बोलताना माजी आमदार के. पी. पाटील, सोबत राहुल देसाई, बाळ देसाई, रणजित पाटील,मधुकर देसाई आदी उपस्थित होते.

Web Title: Our government of rhinoceros skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.