न्यायालयाबाहेर भरधाव मोटार दुचाकींच्या ताफ्यात घुसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:23 AM2021-02-07T04:23:43+5:302021-02-07T04:23:43+5:30

कोल्हापूर : शनिवारी सकाळी भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर लावलेल्या दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात ...

Outside the court, Bhardhaw entered a convoy of motorbikes | न्यायालयाबाहेर भरधाव मोटार दुचाकींच्या ताफ्यात घुसली

न्यायालयाबाहेर भरधाव मोटार दुचाकींच्या ताफ्यात घुसली

Next

कोल्हापूर : शनिवारी सकाळी भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर लावलेल्या दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही. या अपघातातील जखमींना उपचारासाठी खर्च दिल्याने अखेर या प्रकरणावर पडदा पडला.

न्यायालयीन कामासाठी सांगली येथील मुल्ला कुटुंबीय शनिवारी कोल्हापुरात आले होते. या कुटुंबातील दोन मुली न्यायालयीन कामात व्यस्त होत्या तर वयस्कर दाम्पत्य, त्यांची मुलगी आणि २ नातू न्यायालयाबाहेर थांबले होते. दरम्यान, कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथून कोल्हापुरात आलेल्या व्यक्तीचा मोटारीवरील ताबा सुटला अन् ही मोटार थेट न्यायालयाबाहेर उभा केलल्या दुचाकींच्या ताफ्यात घुसली. सुदैवाने मोटारीच्या खाली एक दुचाकी अडकल्याने पुढील अनर्थ टळला. या अपघातात न्यायालयाबाहेर बसलेली लहान मुले व वृध्दाला दुखापत झाली. यावेळी वाहनांचा मोठा आवाज आल्याने नागरिक मदतकार्यासाठी धावले. तिघाही जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. मोटारचालकाने जखमींचा खर्च देण्याची जबाबदारी घेतल्याने या प्रकरणावर पडदा पडला.

Web Title: Outside the court, Bhardhaw entered a convoy of motorbikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.