शहरात ७00 पेक्षा जास्त डेंगूचे रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:49 PM2019-11-12T12:49:30+5:302019-11-12T12:52:42+5:30
कोल्हापूर शहरामध्ये डेंगूच्या रूग्णात पुन्हा वाढ होत आहे. खासगी रूग्णालयामध्ये डेंगूचे रूग्ण आढळून येत आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल ७00 पेक्षा जास्त रूग्णांना डेंगू झाला असून तिघांचा मृत्यु झाला आहे. महापालिकेकडून उपाय योजनेसाठी यंत्रणा कामाला लागली आहे. परंतू शंभर टक्के यश मिळत नाही, हे वास्तव आहे.
कोल्हापूर : शहरामध्ये डेंगूच्या रूग्णात पुन्हा वाढ होत आहे. खासगी रूग्णालयामध्ये डेंगूचे रूग्ण आढळून येत आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल ७00 पेक्षा जास्त रूग्णांना डेंगू झाला असून तिघांचा मृत्यु झाला आहे. महापालिकेकडून उपाय योजनेसाठी यंत्रणा कामाला लागली आहे. परंतू शंभर टक्के यश मिळत नाही, हे वास्तव आहे.
महापूर आणि परतीच्या पावसानंतर डेंगूची साथ पुन्हा डोके वर काढत आहे. कोल्हापूर शहरामध्ये तापाचे रूग्णांची संख्या वाढत असून यामध्ये डेंगू पॅझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत.
महापालिका प्रशासनाकडून उपाय योजना सुरू आहेत. मात्र, अपेक्षित यश येत नाही. खासगी रूग्णालयामध्ये अशा प्रकारच्या आजारचे रूग्ण मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत. महापालिकेच्या साथ रोग विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात ७00 पेक्षा जास्त रूग्णांना डेंगू झाला आहे.
दहा रूग्णांचे रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह
महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने सोमवारी केलेल्या सर्व्हेक्षणात नव्याने दहा रूग्णांची भर पडली आहे. त्यांच्या रक्तांचे नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. १८३८ घरांचा सर्व्हे केला. यामध्ये ८५८५ नागरीकांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ११३ कंटेनर दुषित आढळून आले.
सध्या तापाचे रूग्णात वाढ झाली आहे हे वास्तव आहे. परंतू प्रत्येक तापाच्या रूग्णाला डेंगू झाला असे म्हणणे योग्य ठरणार नाही. तरीही महापालिकेकडून डेंगूचा समुळ नाश होण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. मनपाच्या ११ नागरी आरोग्य केंद्रातील पथक वॉर्ड निहाय सर्व्हेक्षण (उपाय योजना) करत आहे.
डॉ. दिलीप पाटील,
मनपा आरोग्य अधिकारी
महापालिकेकडून सुरू असलेल्या उपाय योजना
- पाण्याचे साठे रिकामे करणे
- साठे रिकामे करता येत नसेलतर आळ्या नाश करणारी औषध टाकणे
- रिकामी नारळाची कवठी, टायरी जप्त करणे
- धुर फवारणी
- औषध फवारणी
- हँड बीलच्या माध्यमातन जनजागृत्ती