कोल्हापूर जिल्ह्यातील २०० गुन्हेगार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:41 AM2018-04-12T00:41:32+5:302018-04-12T00:41:32+5:30

Over 200 criminals in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यातील २०० गुन्हेगार हद्दपार

कोल्हापूर जिल्ह्यातील २०० गुन्हेगार हद्दपार

Next


कोल्हापूर: जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी टोळीद्वारे खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, ठार मारण्याची धमकी, जबरी चोरी, प्राणघातक शस्त्रांनिशी बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे, आदी गंभीर गुन्हे करणाऱ्या जिल्ह्यातील दोनशे गुंडांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी बुधवारी दिली.
आगामी शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साही वातावरणात पार पडावी, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस दल मेहनत घेत आहे. संवेदनशील भागात सशस्त्र संचलनासह लोकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. पैशांसाठी वाटेल ते करणारे येथील गुन्हेगार दंगल घडवून आणण्यामध्येही आघाडीवर असल्याचे चित्र आहे. महापुरुषांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील सुमारे दोनशे गुन्हेगारांना हद्दपार केल्याचे मोहिते यांनी सांगितले.
महालिंगपुरे टोळीचा समावेश
शहापूर आणि हातकणंगले पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध व्यावसायिक व गुन्हेगारी क्षेत्रातील टोळीप्रमुख हणमंत जाधव, दस्तगीर महालिंगपुरे यांच्यासह २४ जणांना वर्षासाठी हद्दपार केले आहे. त्यामध्ये हणमंत निवृत्ती जाधव (रा. संत मळा, इचलकरंजी), संदीप प्रकाश कोरवी, अक्षय अर्जुन भोसले, प्रवीण शंकर कांबळे (जवाहरनगर, इचलकरंजी), जयसिंग केशव मछले (रा. खोतवाडी), अजय दगडू खामकर (रा. वेताळपेठ, इचलकरंजी), सुरेश तुकाराम रणदिवे, शशिकांत महादेव जाधव, विलास बापू सूर्यवंशी, लाला गुडेलाला कुशवाह (तिघे, रा. तारदाळ, ता. हातकणंगले), सुरेश विठ्ठल बंगाडी (रा. कबनूर, ता. हातकणंगले), नूरमहमंद ऊर्फ समीर बाबू मुल्ला (रा. आसरानगर, इचलकरंजी), सुधाकर बापू हेरवाडे (रा. कारंडे मळा, इचलकरंजी), झाकीरहुसेन आबालाल शेख (रा. हनुमाननगर, इचलकरंजी), दस्तगीर हसन महालिंगपुरे, अजित दामोदर मोरे (रा. कुंभोज, ता. हातकणंगले), विवेक मुरलीधर लोहार (रा. कोरोची), किरण विश्वास भंडारी, भगवान ज्ञानू शेटे, संदीप बाबासाहेब भेंडगुले (सर्व, रा. नरंदे), गजानन पुंडलिक काकडे (रा. आळते, ता. हातकणंगले), राकेश शरद गायकवाड (रा. धनगर गल्ली, हातकणंगले), संतोष विष्णू कुपटे (गणपती कट्टा, जवाहरनगर, इचलकरंजी), शशिकांत पांडुरंग पाटील (रा. वेताळ चौक, हातकणंगले)
२१ लॉजचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव
‘यात्री निवास’च्या नावाखाली लॉजवर वेश्या व्यवसाय चालविणाºया जिल्ह्यातील २१ लॉजचे परवाने कायमस्वरूपी बंद करा, या मागणीचा लेखी प्रस्ताव जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सादर केला आहे. कोल्हापूर शहर, इचलकरंजी आणि जयसिंगपूर येथील लॉजचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी बुधवारी दिली.
‘लॉज’, ‘यात्री निवास’च्या नावाखाली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय, कुंटणखाने चालतात. अनैतिक व्यापार प्रतिबंधक विभागाचे पथक, विशेष पथकाने काही लॉजवर छापे टाकून वेश्या व्यवसायांवर कारवाई केली आहे. गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी अशा प्रकारच्या लॉज व यात्री निवासांची यादी तयार केली आहे. जिल्ह्यात २५० पेक्षा अधिक लॉज आहेत; मात्र २१ लॉजमध्ये वेश्या व्यवहार चालतो, त्या ठिकाणी वारंवार छापे टाकून कारवाई केली आहे. लॉजमालकांना वेळोवेळी सूचना, कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे वादग्रस्त २१ लॉजची यादी तयार करून त्यांचे परवाने रद्द करावेत, असा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांना सादर केला आहे.
युवक-युवतींना
प्रवेश देऊ नये
शाळा, महाविद्यालयांतील युवक-युवतींना लॉज, हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नका? असे आदेश पोलिसांनी लॉजमालकांना दिले आहेत. केवळ व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून लॉजमालक अनैतिक व्यवहारांना प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना वारंवार सूचना करूनही फरक पडत नसल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असल्याचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.

Web Title: Over 200 criminals in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.