वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या पोलिसांच्या बदल्या कधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:46 PM2018-04-11T23:46:29+5:302018-04-11T23:46:29+5:30

Over the years, the police shifted to Thane | वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या पोलिसांच्या बदल्या कधी

वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या पोलिसांच्या बदल्या कधी

Next

अतुल आंबी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : वस्त्रनगरीतील उद्योजक, सूत दलाल, व्यापारी यांच्यासह अवैध व्यावसायिकांशी आपले ‘सूत’ जुळवून घेऊन वर्षानुवर्षे ‘तग’ धरून शहरातच नोकरी करणाऱ्या पोलिसांच्या यंदातरी बदल्या होणार का? शहरातील तीन पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वाहतूक शाखा या ठिकाणीच बदल्या करून घेऊन आपली ‘यंत्रणा’ नियमित ठेवणाºया अशा पोलिसांमुळे खाकीला डाग पडताना दिसत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलीस अधिकाºयांची दोन-तीन वर्षांनी, तर कर्मचाºयांची सहा वर्षांनी दुसरीकडे बदली करण्याचा नियम आहे. एक कर्मचारी एका डिव्हीजनमध्ये (उपअधीक्षक कार्यक्षेत्र) १० ते १२ वर्षे राहू शकतो. त्यानंतर त्या कर्मचाºयाची दुसºया डिव्हीजनमध्ये बदली केली जाते. कारण अधिकारी किंवा कर्मचारी यांचे एखाद्याबरोबर निर्माण झालेला वाद, पूर्वग्रहदूषितपणा यामुळे संबंधिताला त्रास होऊ शकतो. तसेच लागलेली अन्य स्वरूपाची ‘यंत्रणा’ मोडीत निघावी, हा उद्देश आहे. मात्र, तो उद्देश इचलकरंजी शहरात सफल होताना दिसत नाही. काही पोलीस कर्मचारी वर्षानुवर्षे याच शहरातील विविध पोलीस ठाण्यांत बदली करून घेतात. हद्द बदलली तरी जुन्या हद्दीतील ‘यंत्रणा’ कार्यान्वित ठेवली जाते. त्यानंतर बदली झालेल्या ठाण्यांतही यंत्रणेत सहभागी होता येते, असा दुहेरी फायदा ते करून घेतात.
प्रामाणिकपणे काम करणाºयांवर अन्याय
1 काही मर्जीतील पोलीस कर्मचारी बदली झाली तरी त्याच पोलीस ठाण्यात काम करत राहतात. बदली झालेल्या ठिकाणी हजर होत नाहीत, त्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांमार्फत वशिलाही लावतात. तसेच काही कर्मचारी वशिलेबाजीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस उपअधीक्षक कार्यालय याठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसतात. अशा कर्मचाºयांचे उपद्व्याप व उठाठेव पाहिली, तर सर्वसामान्यांना धसका बसेल, अशी असते.
2 पोलीस खात्यातील अशा काही कर्मचाºयांमुळे अनेकवेळा खाकी वर्दीवर डाग पडतात. अशा प्रकारांमुळे प्रामाणिकपणे काम करणाºया पोलिसांवर मात्र अन्याय होतो. त्यांचे खच्चीकरण होऊन त्याचा कामावरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे या प्रकाराकडे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष देऊन यंदातरी अशा कर्मचाºयांची उचलबांगडी करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Over the years, the police shifted to Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.