प्रतिकूल परिस्थितीवर मात करत टॅक्सी चालकाची मुलगी बनली सीए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:29 AM2021-09-15T04:29:43+5:302021-09-15T04:29:43+5:30
आई-वडिलांचे कष्ट पाहून ती नेहमी हतबल होत असे. ही परिस्थिती बदलायची असेल, तर आपण काही तरी केले पाहिजे. हे ...
आई-वडिलांचे कष्ट पाहून ती नेहमी हतबल होत असे. ही परिस्थिती बदलायची असेल, तर आपण काही तरी केले पाहिजे. हे स्वप्न उराशी बाळगून आपण सीए बनायचेच ही जिद्द मनाशी बाळगून अभ्यासाला लागली. बारावी झाल्यावर दिवसभर ऑफिसमध्ये कामाला जायचे व घरी येऊन रात्रभर अभ्यास करायचा. त्यात दोन वर्षे कोरोना असल्याने परीक्षा होत नव्हत्या. याचाही मनावर तणाव असताना, अखेर जुलै महिन्यात परीक्षा झाली. सीए परीक्षेचा निकाल लागला, यामध्ये रितिशा उत्तीर्ण झाल्याने तेऊरवाडी ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गावातील पहिली सीए होण्याचा मान या मराठमोळ्या रितिशाने पटकावला.
प्रतिक्रिया : यशस्वी होण्यासाठी परिस्थिती आडवी येत नाही. कठोर परिश्रम, जिद्द व संयम असणे खूप गरजेचे आहे. यशस्वी व्हायचे असेल, तर आपली स्वप्ने मोठी ठेवा. शिक्षकाकडून योग्य ते मार्गदर्शन घ्या व एकदा निवडलेल्या क्षेत्राशी प्रामाणिक राहा, यश कोणीच रोखू शकत नाही.
रितीशा हेंडोळे, सीए
फोटो : रितीशा हेंडोळे १४०९२०२१-गड-१४