आईस्क्रिमचे बिल मागितल्याच्या रागातून तरुणास भोसकुन गाडीची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 01:37 PM2019-02-05T13:37:50+5:302019-02-05T13:39:27+5:30

कोल्हापूर : देवकर पाणंद येथे बिल मागितल्याच्या रागातून परिसरातील फाळकुटदादांनी तरुणास चाकुने भोसकुन आईस्क्रिमच्या गाडीची तोडफोड केली. धिरज शिवाजी ...

The owner of the bill demanded a bill from the engineers of the car | आईस्क्रिमचे बिल मागितल्याच्या रागातून तरुणास भोसकुन गाडीची तोडफोड

आईस्क्रिमचे बिल मागितल्याच्या रागातून तरुणास भोसकुन गाडीची तोडफोड

ठळक मुद्देआईस्क्रिमचे बिल मागितल्याच्या रागातून तरुणास भोसकुन गाडीची तोडफोडदेवकर पाणंद येथील घटना : दहा फाळकुटदादांवर गुन्हा

कोल्हापूर : देवकर पाणंद येथे बिल मागितल्याच्या रागातून परिसरातील फाळकुटदादांनी तरुणास चाकुने भोसकुन आईस्क्रिमच्या गाडीची तोडफोड केली. धिरज शिवाजी शिंदे (वय २८, रा. संतोष कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) असे जखमीचे नाव आहे. त्याचेवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.

परिसरातील दहा ते बारा फाळकुटदादांवर याप्रकरणी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. जखमी शिंदे याची गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन आणि २७ हजार रोकड यावेळी चोरुन नेण्यात आली. या प्रकाराने देवकर पाणंद, सानेगुरुजी वसाहत परिसरात तणाव निर्माण झाला.

अधिक माहिती अशी, धीरज शिंदे याची देवकरण पाणंद येथे आईस्क्रिमची गाडी आहे. त्यावर बिहारी कामगार ठेवले आहेत. देवकर पाणंद येथील फाळकुटदादा या गाडीवर रोज येवून फुक्क़ट आईस्क्रिम खात असे. नेहमीप्रमाणे तो सोमवारी साडेदहाच्या सुमारास आला. त्याचेसोबत आणखी नऊ साथीदार होते. या सर्वांनी दहा आईस्क्रिम घेतली. त्याचे बिल तीनशे रुपये झाले.

कामगाराने बिल मागितलेनंतर फाळकुटदादाने बिल मागतो काय, इलाका माझा आहे. बिल देत नाही, गाडी चालावायची आहे तर आईस्क्रिम फुकट दिले पाहिजे असा दम दिला. बिथरलेल्या कामगाराने धीरज शिंदे याला फोन करुन बोलवून घेतले. शिंदे याने एक आईस्क्रिम फुकट ठिक आहे, दहा देणे शक्य नाही असे म्हटल्यावर संशयित थांब तुला आता सोडत नाही, असे म्हणून निघून गेले.

रात्री साडेअकराच्या सुमारास गाडी बंद करुन घरी जात असताना संशयित चाकु, बांबु, दगड घेवून आले. आम्हाला दमदाटी करतोस काय, म्हणून आईस्क्रिमच्या गाडीची तोडफोड करुन धीरजवर चाकुने हल्ला केला. याप्रकाराने देवकर पाणंद परिसरात गोंधळ उडाला.

कामगारांनी जखमी धीरजला सीपीआरमध्ये दाखल केले. या फाळकुटदादांनी चार दिवसापूर्वी फुक्कट आईस्क्रिम दिले नाही म्हणून धीरज शिंदे याचेशी वादावादी केली होती. आईस्क्रिम फुकट दिले नाही तर परिसरात धंदा करायचा नाही, अशी धमकी फाळकुटदादाने दिली होती. परिसरातील काही राजकीय पुढाऱ्यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला होता. पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे तपास करीत आहेत.
 

 

Web Title: The owner of the bill demanded a bill from the engineers of the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.