जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कौंन्सेटेटर व बायपॅप : राजेंद्र पाटील यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 06:22 PM2021-06-02T18:22:01+5:302021-06-02T18:23:57+5:30

CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासकीय रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर कमी पडत आहेत, याला पर्याय म्हणून सीएसआर फंडातून जिल्ह्यासाठी ४० ऑक्सीजन कोंन्सेटेटर व २५ बायपॅप उपलब्ध करून दिल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बुधवारी दिली.

Oxygen Concentrator and Bipap for the District: Rajendra Patil Yadravkar | जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कौंन्सेटेटर व बायपॅप : राजेंद्र पाटील यड्रावकर

जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कौंन्सेटेटर व बायपॅप : राजेंद्र पाटील यड्रावकर

Next
ठळक मुद्देजिल्ह्यासाठी ऑक्सिजन कौंन्सेटेटर व बायपॅप : राजेंद्र पाटील यड्रावकरकोरोना बाधित रुग्णांवरील उपचारांसाठी वैद्यकीय उपकरणांचा वापर फायदेशीर

कोल्हापूर : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासकीय रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर कमी पडत आहेत, याला पर्याय म्हणून सीएसआर फंडातून जिल्ह्यासाठी ४० ऑक्सीजन कोंन्सेटेटर व २५ बायपॅप उपलब्ध करून दिल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बुधवारी दिली.

जिल्ह्यातील पारगांव, राधानगरी व गडहिंग्लज येथे प्रत्येकी चार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, आयजीएम इचलकरंजी येथे तीन, कोव्हिड हॉस्पिटल शिरोळ येथे २५ कोंन्सेटेटर उपलब्ध करून दिली आहेत, तसेच शासकीय रुग्णालय गडहिंग्लज येथे 10, कोव्हिड हॉस्पिटल शिरोळ येथे 6 तर आयजीएम इचलकरंजी येथे 9 अशी एकूण 25 बायपॅप दिली असल्याचेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले आहे.

कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारांसाठी या वैद्यकीय उपकरणांचा वापर फायदेशीर ठरत असल्याने व्हेंटिलेटर उपलब्ध होणार नसलेल्या रुग्णांलयामध्ये या उपकरणांचा मोठा लाभ होईल असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसाठी ४० ऑक्सिजन कोंन्सेटेटर तर २५ बायपॅप उपलब्ध करून दिली असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामधील कोरोना रुग्णांची संख्या पहाता जिल्ह्यातील आरोग्य विभाग सक्षमपणे काम करीत आहे, आरोग्य विभागाबरोबरच शासनाच्या विविध विभागातील फ्रन्टलाइन वर काम करणारे अधिकारी व कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेत आहेत, असे असताना जनतेनेही काळजी घेताना शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळायला हवेत तरच या महामारीला आपण रोखू शकू असेही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी म्हंटले आहे,

Web Title: Oxygen Concentrator and Bipap for the District: Rajendra Patil Yadravkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.