शाहु साखर कारखान्याच्या कोविड सेंटरलाही ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर्स देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:41+5:302021-06-05T04:18:41+5:30

कागल : येथे कोरोना आढावा बैठक. कागल मुश्रीफ फाउंडेशन व अन्य सेवाभावी संस्था कंपनी आणि व्यक्तींच्या माध्यमातून आपण ...

Oxygen concentrators will also be provided to the Kovid Center of Shahu Sugar Factory | शाहु साखर कारखान्याच्या कोविड सेंटरलाही ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर्स देणार

शाहु साखर कारखान्याच्या कोविड सेंटरलाही ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर्स देणार

Next

कागल : येथे कोरोना आढावा बैठक.

कागल मुश्रीफ फाउंडेशन व अन्य सेवाभावी संस्था कंपनी आणि व्यक्तींच्या माध्यमातून आपण कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा साहित्याची उपलब्धता करून देत आहोत. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह इचलकरंजी, कागल, सेनापती कापशी, गडहिंग्लज, उत्तुर, मुरगूड, मुदाळ, शेंडूरसह छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कोविड केंद्रालाही तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कागल येथे कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, संजय ठाणेकर आदी प्रमुख उपस्थित होते. तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पाटील, मुख्याधिकारी पंडित पाटील, हेमंत निकम यांनी कोरोना परिस्थितीची माहिती सादर केली.यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. सोनावणे, उपअभियंता डी. व्ही. शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, विकास बडवे आदी अधिकारी उपस्थितीत होते.

चौकट

● आधी म्युकरमायकोसिसची औषधे द्या.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, करंबळी ता. गडहिंग्लज येथील संजय माळी म्युकरमायकोसिसने आजारी आहेत. त्यांची पत्नी त्यावरील इंजेक्शनसाठी रोज टाहो फोडत आहे. अन्य औषधांप्रमाणे यावरील औषधांचे नियंत्रण ही केंद्र सरकारकडे आहे. मात्र पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्समधून विद्यार्थ्यांना आयपीएल बघणार? की जपान ऑलम्पिक बघणार? असे प्रश्न विचारत आहेत. आधी सगळ्यांना लस आणि औषधे द्या. मग ठरवू काय बघायचे ते.

फोटोओळी ....... कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथील साउंड कास्टिंग या कंपनीने कोविड केअर सेंटरला देण्यासाठीची दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे दिली. यावेळी कंपनीचे प्रतिनिधी सुदेश हरिदास व संतोष डकरे व इतर प्रमुख उपस्थितीत होते.

Web Title: Oxygen concentrators will also be provided to the Kovid Center of Shahu Sugar Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.