रुग्णालयांचे शनिवारपर्यंत ऑक्सिजन, फायर ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:25 AM2021-04-28T04:25:54+5:302021-04-28T04:25:54+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन वायू नलिकांची व प्रणालीची तपासणी, फायर व स्ट्रक्चरल ऑडिट, हॉस्पिटलमधील ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन वायू नलिकांची व प्रणालीची तपासणी, फायर व स्ट्रक्चरल ऑडिट, हॉस्पिटलमधील सर्व इलेक्ट्रिकल ऑडिट करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने सर्वंकष अहवाल शनिवारपर्यंत (१ मे) सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिले.
राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन गळती व इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय व खासगी रुग्णालयामधील ऑक्सिजन ऑडिट, फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट करावे. ऑक्सिजन पुरवठा हा रुग्णाच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याचा योग्य वापर करावा. ऑक्सिजन वाया जाऊ नये म्हणून ऑक्सिजन नलिकांची तपासणी होणे गरजेचे आहे.
या समितीने शासकीय व खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन वायू नलिकांची व प्रणालीची तपासणी, फायर व स्ट्रक्चरल ऑडिट करणे, हॉस्पिटलमधील सर्व इलेक्ट्रिकल ऑडिट करून त्याचा अहवाल ३० एप्रिलपर्यंत सादर करायचा आहे.
---
अशी आहे समिती..
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यायालये, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयालये तसेच औद्योगिगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य यांची जिल्हास्तरीय समितीमध्ये समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. प्रत्यक्ष ऑडिट करण्यासाठी १२ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.