‘आयजीएम’मध्ये ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:25 AM2021-05-08T04:25:09+5:302021-05-08T04:25:09+5:30
इचलकरंजी : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्याच्या हेतूने येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात मिशन ...
इचलकरंजी : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्याच्या हेतूने येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात मिशन ऑक्सिजनअंतर्गत ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी ३० लाख ८३ हजार रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिली.
शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली असल्याने पूर्वतयारी म्हणून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात ६ केएल क्षमतेचा लिक्विड टॅँक आहे. ५८.३३ एनएम३/एचआर इतक्या क्षमतेचा असून, त्याद्वारे दैनंदिन २०० सिलिंडरची निर्मिती होणार आहे. हे रुग्णालय हातकणंगले व शिरोळ तालुका व नजीकच्या सीमाभागासाठी उपयुक्त असल्याने या प्रकल्पामुळे ऑक्सिजनचा भासणारा तुटवडा कमी होणार आहे.