इनरव्हिलतर्फे ऑक्सिजन हिल उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:23 AM2021-08-01T04:23:37+5:302021-08-01T04:23:37+5:30
कोल्हापूर : येथील इनरव्हिल क्लब ऑफ सनराईजच्यावतीने त्र्यंबोली टेकडी परिसरात वृक्षारोपण करुन ‘ऑक्सिजन हिल’ हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी ...
कोल्हापूर : येथील इनरव्हिल क्लब ऑफ सनराईजच्यावतीने त्र्यंबोली टेकडी परिसरात वृक्षारोपण करुन ‘ऑक्सिजन हिल’ हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी माजी आमदार मालोजीराजे उपस्थित होते. यावेळी मालोजीराजे यांनी वृक्षांची लागवड त्यासोबतच निगा राखण्याचे कार्य असेच अविरत घडावे, कोल्हापूरच्या चारही बाजूंनी वेढलेल्या टेकड्यांवर असा उपक्रम राबविला पाहिजे, असे सांगत या कार्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यानंतर अध्यक्षा शर्मिला खोत व सचिव मनीषा जाधव यांनी पर्यावरणाचा समतोल आणि ऑक्सिजन पुरवठा याचा विचार करत संस्थेच्यावतीने ५०० झाडे ३ टप्प्यात लावण्यात येणार असल्याचे सांगितले. या उपक्रमासाठी स्मिता खामकर यांचे मार्गदर्शन व शिवाजी तरुण मंडळ, उभा मारुती तरुण मंडळ महापालिकेच्या उद्यान विभागाचे वसंत व्याघ्राम्बरे व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
---
फोटो नं ३१०७२०२१-कोल-इनरव्हील क्लब
ओळ : कोल्हापुरातील टेंबलाई टेकडी परिसरात इनरव्हिल क्लब ऑफ सनराईजच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.
--