आॅक्सिजन पार्कचाच श्वास कोंडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:53 AM2019-06-05T00:53:27+5:302019-06-05T00:53:31+5:30
दीपक जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मोठा गाजावाजा करून येथील शेंडापार्क परिसरात उभारलेल्या आॅक्सिजन पार्कमधील झाडे करपून ...
दीपक जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मोठा गाजावाजा करून येथील शेंडापार्क परिसरात उभारलेल्या आॅक्सिजन पार्कमधील झाडे करपून गेल्याने पार्कमधील आॅक्सिजनच गायब झाल्याचे चित्र आहे. कृषी विभागाने झाडे लावताना त्या रोपांच्या प्लास्टिकच्या पिशव्याही काढण्याची तसदी घेतलेली नाही.
लागवडीनंतर झाडांची निगा न राखल्याने ती रोपे करपून गेली असून, केवळ खड्डेच शिल्लक आहेत. ही वृक्षलागवड केवळ फोटोसेशनपुरती मर्यादित राहिल्याने तालुक्यात १३ कोटी वृक्षलागवड योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. निसर्गाचा समतोल ढासळत असल्याने राज्य सरकारने राज्यभरात ५० कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत शेंडा पार्कात राज्यातील पहिल्या आॅक्सिजन पार्कसाठी एक कोटी ७८ लाख खर्च करून ३६ हेक्टर जागेत ४२ प्रजातींतील ३९ हजार ९६९ वृक्षांचे रोपण करण्यात आले. त्यात सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली १३ हजार झाडे सोडली, तर कृषी विभागासह इतर विभागांनी केलेल्या वृक्षलागवडीचा पुरता फज्जा उडाला आहे; त्यामुळे शासनानेच केलेला ८० टक्के झाडे जगल्याचा दावाही खोटा ठरला आहे.
पहिल्या गटात लागवड केलेल्या रोपांची वाढ चांगली झाली असून, त्यासाठी वनीकरण विभागाने झाडांची देखभाल करण्यासाठी कायमस्वरूपी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कृषी विभागासह इतर विभागांनी केलेल्या वृक्षलागवडीतील हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच झाडे जगली आहेत.
नालेसफाई ८० टक्के पूर्ण
४कोल्हापूर शहरात जयंती तसेच दुधाळी हे दोन नाले मोठे असून अन्य १२ छोटे नाले आहेत, तर अंदाजे ७०० मोठ्या गटारी / नाले आहेत. लोकसहभाग तसेच महापालिकेची यंत्रणा यांच्या माध्यमातून जयंती नाल्याची सफाई सुरू आहे. चार पोकलॅन, चार जेसीबी, डंपर अशी यंत्रणा घेऊन गेल्या एक महिन्यापासून सुमारे १०० कर्मचारी नाल्यातील गाळ काढणे, पात्र वाढविणे यासारखी कामे करीत आहेत. नालेसफाईचे काम आतापर्यंत ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा आहे. शहरात अमृत योजनेमधून टाकलेली जलवाहिनी, ड्रेनेज लाईन यासाठी खुदाई करण्यात आली होती. त्यामुळे रस्ते खराब झाले होते. ते डांबरी करण्यात येत आहेत.
‘आपत्ती’ची पथके सज्ज
४पावसाळ्यात महापूर आल्यास किंवा कोणतीही दुर्घटना घडल्यास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. १० मे रोजी या यंत्रणेचे सादरीकरण झाले. अग्निशमन, उद्यान, सार्वजनिक बांधकाम अशा तीन विभागांची स्वतंत्र पथके पावसाळ्यात २४ तास काम करणार आहेत. नेहमीच्या अग्निशमन दलासह शहराचे तीन झोन तयार केले असून, त्या प्रत्येक झोनला स्थानक अधिकारी, तांडेल, चार जवान असा जादा कर्मचारी वर्ग नियुक्त केलेला आहे. चोवीस तास अग्निशामक बंबासह आवश्यक त्या रेस्क्यू साहित्यासह ही यंत्रणा सज्ज राहणार आहे. पूरग्रस्तांच्या चहा, नाश्त्याची, जेवणाची सोयदेखील करण्याचे नियोजन केले आहे.
पालकमंत्र्यांच्या
घोषणेला हरताळ
राज्यातील पहिल्या आॅक्सिजन पार्कमधील झाडांचे संगोपन करण्यासाठी कृषी महाविद्यालयाने या पार्कमधील ४० हजार रोपांसाठी बोअर ठिबकसह ओढे, नाल्याच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते वापरता येणे शक्य आहे. त्याची योजना करावी, त्यासाठी लागणारा निधी शासनाच्या योजनेतून देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यावेळी केली होती; परंतु या घोषणेला कृषी विभागानेच हरताळ फासला.