कणेरी मठावरील रुग्णालयातील आक्सिजन प्रकल्प अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:17 AM2021-07-18T04:17:31+5:302021-07-18T04:17:31+5:30

कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिनी संकल्प केल्याप्रमाणे कणेरी मठावरील सिद्धगिरी ...

Oxygen project at Kaneri Math Hospital in final stage | कणेरी मठावरील रुग्णालयातील आक्सिजन प्रकल्प अंतिम टप्प्यात

कणेरी मठावरील रुग्णालयातील आक्सिजन प्रकल्प अंतिम टप्प्यात

Next

कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिनी संकल्प केल्याप्रमाणे कणेरी मठावरील सिद्धगिरी रुग्णालयामधील ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांना केवळ ऑक्सिजनच्या टंचाईमुळे जीव गमवावा लागला. त्यामुळे नेहमीच विधायक पद्धतीने वाढदिवस साजरा करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी कणेरी मठावरील रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. त्याला समाजातील दानशूरांनी पाठबळ दिले. त्यामुळे आता हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असून, त्यातून उच्च दर्जाच्या ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे दर मिनिटाला ५८० लिटर तर, प्रत्येक दिवशी सुमारे १२० मोठ्या ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होणार असून, रोज सुमारे १५० रुग्णांना याचा लाभ देता येणार आहे. तसेच हा प्रकल्प स्वयंचलित असल्यामुळे ऑक्सिजन निर्मितीची प्रक्रिया सतत चालू असणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनची टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

१७०७२०२१ कोल कणेरी मठ

कणेरी मठावरील सिद्धगिरी रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Web Title: Oxygen project at Kaneri Math Hospital in final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.