पी. एन. पाटील यांच्या आपुलकीने तोडणी मजूर भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:27 AM2021-01-16T04:27:40+5:302021-01-16T04:27:40+5:30
आमदार पी. एन. आपल्या कर्मचारी व कष्टकरी वर्गाला नेहमीच आपुलकीची वागणूक देतात. पी. एन. पाटील प्रत्येक वर्षी मकरसंक्रांतीचे औचित्य ...
आमदार पी. एन. आपल्या कर्मचारी व कष्टकरी वर्गाला नेहमीच आपुलकीची वागणूक देतात. पी. एन. पाटील प्रत्येक वर्षी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून भोगावती कारखाना कार्यस्थळावर हजेरी लावतात. न चुकता लावलेली हजेरी ही सर्व घटकांना माहीतच असते. ते आले की तोडणी मजूर ते अधिकारी वर्गापर्यंत सर्वांचेच त्यांच्याभोवती भिरे जमते. तेही सर्वांचीच आस्थेने चौकशी करीत प्रत्येकाला तिळगूळ देत सर्व वर्ष हे आनंदानं जाण्याच्या शुभेछा देतात.
एवढ्या व्यापातून प्रत्येक वर्षी न चुकता मकरसंक्रांतीच्या दिवशी जवळपास तीन तास थांबून कष्टकरी वर्गाला वेळ देतात. सत्ता असो वा नसो; तिची फिकीर न करता ते सामान्य जनतेच्या अडचणी समजून घेत असल्यानेच त्यांच्याभोवती आज कार्यकर्त्यांचा गराडा पाहायला मिळतो.
या कार्यक्रमाला ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, संचालक कृष्णराव किरूळकर, धीरज डोंगळे, विश्वनाथ पाटील, बी. आर. पाटील, हिंदुराव चौगले, सुनील खराडे कार्यकारी संचालक एस. के. चौगले जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील-कौलवकर, सेक्रेटरी सुरेश कांबळे, आदींसह सर्व अधिकारी उपस्थित होते
चौकट
मजूर गेले भारावून!! प्रत्येक वर्षी न चुकता मकरसंक्रांतीला तिळगूळ देण्यासाठी पी. एन . पाटील उपस्थित असतात. आपुलकीने दिलेल्या तिळगुळाने मजूरही भारावून गेले होते.
फोटो
ऊसतोडणी मजुरांना तिळगुळांचे वाटप करताना पी. एन. पाटील, उदयसिंह पाटील कौलवकर व इतर.