चंदगडमध्ये पावणेतीन लाखाचा मद्यसाठा जप्त, दोघांना अटक : दोन दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:20 PM2019-03-04T12:20:28+5:302019-03-04T12:21:31+5:30
आंबेवाडी फाटा (ता. चंदगड) येथे पावणेतीन लाखाचा विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. याप्रकरणी वाहन चालक शिवाजी धाकलु गावडे (वय ३२, रा. पार्ले, गावडे गल्ली, ता. चंदगड), संजय साताप्पा नाईक (रा. हलकर्णी, ता. चंदगड) या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कोल्हापूर : आंबेवाडी फाटा (ता. चंदगड) येथे पावणेतीन लाखाचा विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. याप्रकरणी वाहन चालक शिवाजी धाकलु गावडे (वय ३२, रा. पार्ले, गावडे गल्ली, ता. चंदगड), संजय साताप्पा नाईक (रा. हलकर्णी, ता. चंदगड) या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अधिक माहिती अशी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त वाय. एम. पवार व अधीक्षक गणेश पाटील यांनी भरारी पथकाला जिल्ह्याच्या सीमारेषेवर गस्त वाढवून कारवाईचे आदेश दिले होते.
त्यानुसार २ मार्चला चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा, मोटणवाडी, हेरे, पारगड या रोडवर भरारी पथक गस्त घालत असताना आंबेवाडी फाटा येथे सुमोगाडी भरधाव मोटणवाडीच्या दिशेने जात असताना दिसून आली.
तिचा पाठलाग करुन थांबवून तपासणी केली असता गाडीमध्ये विदेशी मद्याचे बॉकस मिळून आले. संशयित शिवाजी गावडे याचेकडे चौकशी केली असता त्याने संजय नाईक याच्या घरातून आनलेचे सांगितले.
त्यानुसार नाईक याच्या घरावर छापा टाकून आणखी मद्यसाठा जप्त केला. नाईक याने गोव्याहून विक्रीसाठी मद्यसाठा आनला होता. ही कारवाई निरीक्षक संभाजी बरगे, जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवाण संदीप जानकर, सचिन काळे, सागर शिंदे यांनी केली.