पडळकरांनी लोकसहभागातून जोपासली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:20 AM2021-05-30T04:20:47+5:302021-05-30T04:20:47+5:30
गौरवास्पद आहे, पडळ गावचा उपक्रम तालुक्यातील सर्व गावांनी राबवावा असे प्रतिपादन पन्हाळा पोलीस उपनिरीक्षक के.एम.पाटील यांनी केले. पडळ (ता. ...
गौरवास्पद आहे, पडळ गावचा उपक्रम तालुक्यातील सर्व गावांनी राबवावा असे प्रतिपादन पन्हाळा पोलीस उपनिरीक्षक के.एम.पाटील यांनी केले.
पडळ (ता. पन्हाळा) येथे एक हात मदतीचा व मिशन संवेदना या उपक्रमांतर्गत पडळ ग्रामस्थ, पन्हाळा पोलीस व पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने गावातील ६० गरीब, गरजू व निराधार कुटुंबांना ५०० रुपये किमतीचे अन्नधान्य किटचे वाटप करताना ते बोलत होते. या वेळी सरपंच पंडित कांबळे अध्यस्थानी होते.
या कार्यक्रमाचे संयोजक प्रा. नंदकुमार बुराण म्हणाले की, पडळ गावात व्हॉटसॲपवरून लोकांना मदतीचे आवाहन केल्यानंतर यू.पी.आय.वरून लोकांनी न मागता मदत पाठवली जवळपास २५ हजारांच्यावर रक्कम जमा झाली. यातून लोकांना साखर १किलो,तेल १किलो मूग,मसूर,तूरडाळ प्रत्येकी १/२किलो,अंघोळीचा व धुण्याचा साबण,चहापूड,मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले आहे.
यावेळी प. स. सदस्य पांडुरंग खाटकी,उपसरपंच दिगंबर शिंदे, तंटा मुक्ती अध्यक्ष पोपटराव निकम, पश्चिम पन्हाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष शब्बीर मुल्ला,विष्णू चौगले,संजय सोळसे,सर्कल अजय लुगडे,तलाठी मेघा जाधव,जयवंत पाटील,बाळू कदम पोलीसपाटील अभिनंदन पोवार,बाजीराव नांगरे, नवनाथ पाटील पन्हाळा पोलीस कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्तविक प्रा.नंदकुमार बुराण, आभार विष्णू मोहिते यांनी मानले.
फोटो ओळ-पडळ येथे निराधार, विधवा व गरीब लोकांना अन्नधान्य वाटप करताना पो.उपनिरीक्षक के.एम.पाटील,सरपंच पंडित कांबळे आदी मान्यवर.