शाहूवाडी तालुक्यात भात रोप लागण खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:31 AM2021-07-07T04:31:11+5:302021-07-07T04:31:11+5:30

शाहुवाडी तालुक्यात प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. त्यामुळे भातरोप लावण केली जाते. रोप लावणीची तयारी मे महिन्याच्या ...

Paddy plant infection was detected in Shahuwadi taluka | शाहूवाडी तालुक्यात भात रोप लागण खोळंबली

शाहूवाडी तालुक्यात भात रोप लागण खोळंबली

Next

शाहुवाडी तालुक्यात प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. त्यामुळे भातरोप लावण केली जाते. रोप लावणीची तयारी मे महिन्याच्या अखेरीपासून केली जाते. सुखातीला भाताचा तरवा टाकून रोपे तयार केली जातात. जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात भात रोप लावणीला सुरुवात होते. पावसाने दमदार सुरवात केल्याने शेती वाफ्यामध्ये पाणी साठवून चिखल गुठ्ठा पद्धतीने रोप लावण केली जाते. जुनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार सुरवात केली. पण गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. त्यामुळे तालुक्यात भातरोप लावण पूर्णपणे खोळंबली आहे. काही शेतकरी नदीच्या पाण्यावर भातरोप लावण करीत आहेत. मात्र पाण्याअभावी भाताची रोपे सुकू लागली आहेत. बहुतांश ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने रोप लावणीची कामे पावसावर अवलंबून आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Paddy plant infection was detected in Shahuwadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.