पाडवा, भाऊबीज खरेदीची उलाढाल कोटीत

By admin | Published: November 14, 2015 12:23 AM2015-11-14T00:23:05+5:302015-11-14T00:30:01+5:30

सोन्याला मागणी : मोबाईल, एलसीडी, आदींची मोठ्या प्रमाणात विक्री; गर्दीमुळे शहरातील वाहतुकीवरही ताण

Padova and brother-in-house turnover | पाडवा, भाऊबीज खरेदीची उलाढाल कोटीत

पाडवा, भाऊबीज खरेदीची उलाढाल कोटीत

Next

कोल्हापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि. १२) व भाऊबिजेनिमित्त शुक्रवारी सोने-चांदी, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेमध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली़ आकर्षक योजना, नावीन्यपूर्ण उत्पादने आणि कर्जसुविधांचा फायदा घेत ग्राहकांनी खरेदीचा यथेच्छ आनंद लुटला़
यंदा दिवाळी पाडव्याच्या खरेदीवर मोहोर उमटविली ती मोबाईल, सोने बाजारपेठेने़ गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल ६० टक्क्यांची वृद्धी या बाजारपेठेने नोंदविल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़; कारण सोन्याच्या दर २६ हजार १००च्या आसपास पोहोचला होता. होम अप्लायसेन्स, सोने-चांदी बाजार तसेच मोबाईल शॉपी गर्दीने फुलल्या होत्या़ सकाळपासूनच ग्राहकांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवरही प्रचंड ताण पडला़ ग्राहकांनी अक्षरश: रांगा लावून खरेदी केली़; इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत टीव्ही, एलईडी, होम थिएटर, सीडी प्लेयर तसेच मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉशिंग मशीन, फ्रीज या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती़ महापालिका निवडणुकीमुळे थंडावलेली बाजारपेठ दिवाळी सुरू होताच पुन्हा तेजीच्या शिखरावर पोहोचली़ शहरातील बहुतांश इलेक्ट्रॉनिक कंपन्यांकडून शोरूममध्ये शून्य टक्के व्याजदर आणि प्रथमच झिरो डाउन पेमेंटवर खरेदीची आॅफर देण्यात आली होती़ ग्राहकांनी या योजनेचा पुरेपूर फायदा घेतला़ सोनी, एलजी, सॅमसंग, व्हिडीओकॉन, पॅनासॉनिक, गोदरेज या कंपन्यांच्या उत्पादनांना चांगली मागणी होती़ विविध नामांकित कंपन्यांच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक शिलाई मशीन्सनाही चांगली मागणी होती़ विविध फायनान्स कंपन्या आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी झिरो डाउन पेमेंट, एक्स्ट्रा वॉरटी आॅफर, लकी ड्रॉ, अशा क्लृप्त्या वापरून ग्राहकांना आकर्षित केले़ इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या खरेदीसाठी टेंबे रोड, शाहू स्टेडियम, शिवाजी स्टेडियम, राजारामपुरी, शाहूपुरी, महाद्वार येथील शोरूम्स गर्दीने फुलली होती.‘एलईडी’च्या विविध श्रेणी साडेसात हजारांपासून ते २० लाख, फ्रिज १० हजार ते १़५० लाख, वॉशिंग मशीन साडेचार हजार ते २० हजार, मायक्रोवेव्ह ओव्हन सात ते २५ हजार, तसेच होम थिएटर सहा हजार ते अडीच लाखांपर्यंत उपलब्ध आहेत़ बाजारातील स्पर्धेमुळे तसेच झिरो डाउन पमेंट योजनेमुळे किंमतलाभाचा फायदा ग्राहकांना होत आहे़ त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्कृष्ट प्रतिसाद लाभला आहे. फ्रीज, वॉशिंग मशीन यांच्या खरेदीला ग्राहकांनी पहिली पसंती दिली, अशी माहिती सिद्धी होम अप्लायन्सेसचे सचिन मांगले यांनी दिली.
सॅमसंग, मोटोरोला, जीओनी, पॅनोसोनिक, इंटेक्स, लिनोव्हा, सोनी, व्हिवो,ओपो, आदी कंपन्यांच्या अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सना जास्त मागणी होती़ गतवर्षीच्या तुलनेत या कंपन्यांच्या अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सच्या विक्रीमध्ये सरासरी ६० टक्क्यांची वृद्धी झाली़ सॅमसंग, जिओनी, सोनी, इंटेक्स, लिनोव्हा, ओपो या कंपन्यांच्या अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सना चांगली मागणी होती़ सोनीचे अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्स १२ ते ४७ हजार, इंटेक्स ४ ते १५ हजार, लिनोव्हा ८ ते १५, तर सॅमसंग साडेपाच ते ४० हजार, जिओनी ५ ते ३० हजारांमध्ये उपलब्ध आहेत. बेसिक अ‍ॅप्लिकेशन्सच्या तुलनेत अ‍ॅँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशनची सुविधा असलेल्या मोबाईल्सनाही मोठी मागणी होती. शालेय मुलांनीही अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सच्या खरेदीला पसंती दिली़ अगदी २२५० पासून ७४ हजारांपर्यंतचे हँडसेट बाजारात मोठ्या प्रमाणात विकले गेले. ओपो, सॅमसंग, लिनोव्हा या कंपन्यांच्या मोबाईलना ग्राहकांची पहिली पसंती होती, अशी माहिती म्युझिक शॉपी द मोबाईल स्टोअरचे प्रवीण मोहिते यांनी दिली.
दुचाकी, चारचाकी गाड्यांच्या खरेदीचा वेगही मोठा होता. ग्राहकांनी हजारोंच्या संख्येने दुचाकी खरेदी केल्या; तर चारचाकी गाड्यांमध्ये ग्राहकांची पहिली पसंती राहिली ती मारुती सुझुकीच्या फॅमिली कारना. यात वॅगन आर, सिनोरा या गाड्यांना ग्राहकांनी मोठी पसंती दर्शविली होती. कोल्हापुरातील चारचाकी गाड्यांच्या विक्रीत ७५ टक्के वाटा मारुतीच्या विविध मॉडेल्सचा होता, अशी माहिती साई सर्व्हिसचे सेल्स मॅनेजर आदिनाथ पाटील यांनी दिली.
लकी ड्रॉ, खरेदीवर बक्षीस, सुवर्ण भिशी यासारख्या योजनांमुळे सोने-चांदीच्या बाजारपेठेला चांगला प्रतिसाद लाभला़ अंदाजे २० ते ३० कोटी रुपयांची उलाढाल या बाजारपेठेत झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. कमी वजनाच्या दागिन्यांच्या खरेदीवर महिलांचा जास्त कल राहिला़ गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली़ सोन्याची नाणी, दागिने, आदींच्या खरेदीसाठी सकाळी दहापासूनच ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती़, अशी माहिती महेंद्र ज्वेलर्सचे भरतभाई ओसवाल यांनी दिली. (प्रतिनिधी)

मोबाईल ७४ हजार रुपयांपर्यंत
सॅमसंग, मोटोरोला, जीओनी, पॅनोसोनिक, इंटेक्स, लिनोव्हा, सोनी, व्हिवो, ओपो, आदी कंपन्यांच्या अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सना जास्त मागणी होती़ गतवर्षीच्या तुलनेत या कंपन्यांच्या अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सच्या विक्रीमध्ये सरासरी ६० टक्क्यांची वृद्धी झाली़ सॅमसंग, जिओनी, सोनी, इंटेक्स, लिनोव्हा, ओपो या कंपन्यांच्या अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सना चांगली मागणी होती़ सोनीचे अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्स १२ ते ४७ हजार, इंटेक्स ४ ते १५ हजार, लिनोव्हा ८ ते १५, तर सॅमसंग साडेपाच ते ४० हजार, जिओनी ५ ते ३० हजारांमध्ये उपलब्ध आहेत. बेसिक अ‍ॅप्लिकेशन्सच्या तुलनेत अ‍ॅँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशनची सुविधा असलेल्या मोबाईल्सनाही मोठी मागणी होती. शालेय मुलांनीही अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सच्या खरेदीला पसंती दिली़ अगदी २२५० पासून ७४ हजारांपर्यंतचे हँडसेट बाजारात मोठ्या प्रमाणात विकले गेले. ओपो, सॅमसंग, लिनोव्हा या कंपन्यांच्या मोबाईलना ग्राहकांची पहिली पसंती होती, अशी माहिती म्युझिक शॉपी द मोबाईल स्टोअरचे प्रवीण मोहिते यांनी दिली.

Web Title: Padova and brother-in-house turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.