कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आता पगारी पुजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 03:34 PM2017-08-10T15:34:25+5:302017-08-10T15:36:53+5:30

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाओ संघर्ष समितीसह कोल्हापूरकरांची आक्रमकता आणि स्थानिक आमदारांनी विधानसभेत उठवलेला आवाज यामुळे शासनातर्फे विधी व न्यायमंत्री रणजित पाटील यांनी गुरुवारी तीन महिन्यात अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा कायदा करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचा अहवाल शासनाला जाण्याआधीच हा निर्णय झाल्याने श्री अंबाबाईला घागरा-चोली नेसवण्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूरात सुरु असलेल्या आंदोलनाला ़अन्य देवस्थानांच्या तुलनेत लवकर यश आले.

Pagari priest here at Ambabai temple in Kolhapur | कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आता पगारी पुजारी

अंबाबाई मंदिर

Next
ठळक मुद्देतीन महिन्यात कायदा : रणजित पाटीलआमदारांच्या लक्षवेधीवर सरकारचा निर्णय अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ आंदोलनाला यश जिल्हाधिकाºयांच्या अहवालापूर्वीच निर्णय

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाओ संघर्ष समितीसह कोल्हापूरकरांची आक्रमकता आणि स्थानिक आमदारांनी विधानसभेत उठवलेला आवाज यामुळे शासनातर्फे विधी व न्यायमंत्री रणजित पाटील यांनी गुरुवारी तीन महिन्यात अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा कायदा करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचा अहवाल शासनाला जाण्याआधीच हा निर्णय झाल्याने श्री अंबाबाईला घागरा-चोली नेसवण्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूरात सुरु असलेल्या आंदोलनाला ़अन्य देवस्थानांच्या तुलनेत लवकर यश आले.


श्रीपूजक बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांनी ९ जून रोजी अंबाबाई मूर्तीला घागरा चोली नेसवल्यापासून श्रीपूजक विरोधी आंदोलनाला सुरवात झाली. स्थानिक नागरिकांनी दोन दिवसांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ठाणेकरांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याबत्त गुन्हा नोंद केला. तसेच श्रीपूजकांना सदबुद्धी हे असे साकडेच अंबाबाईला घातले. धर्मतत्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. सुभाष देसाई यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या वटहुकूमाचा संदर्भ देत पुजारी हे सरकारी नोकर आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वटहुकूमाला तथाकथित म्हणून संबोधण्याची चूक श्रीपूजकांना भोवली आणि अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ मागणीचे आंदोलन पेटले.

श्रीपूजकांकडून गेल्या साठ सत्तर वर्षांमध्ये केल्या गेलेल्या चुका, गुन्हे, अंबाबाईच्या नावाने येणारी बेहिशोबी संपत्ती, देवस्थान समितीच्या कामातील अडथळे, प्रधानांची संपलेली वहिवाटी अशा अनेक बाबी गेल्या दोन महिन्यात प्रकाशात आल्या आणि आंदोलनाला पुराव्यानिशी अधिक बळ मिळाले.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बैठकीत श्रीपूजक अजित ठाणेकर यांना मारहाण झाल्यानंतर या विषयावर निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांपुढे सुनावणी प्रक्रिया सुरु झाली. देवस्थान समितीनेदेखील सुनावणीत पगारी पूजारी नेमण्याची मागणी केली. त्याविरोधातही श्रीपूजक न्यायालयात गेल्याने त्यांच्याविरोधात रोष अधिक वाढला होता. जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांना त्यांचा अहवाल शासनाला पाठवण्यासाठी तीन महिन्यांचा म्हणजेच २२ सप्टेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्यांच्याकडून अहवाल बनवण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान प्रश्नाचे महत्व जाणून सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनातच याबाबत निर्णय व्हावा यासाठी स्थानिक आमदार आग्रही असल्याने त्यांनी लक्षवेधीची मागणी केली आणि गुरुवारी झालेल्या चर्चेअंत न्याय व विधी खात्याचे मंत्री रणजित पाटील यांना अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासाठी तीन महिन्यात कायदा करणार असल्याचे जाहीर करावे लागले.


घटनाक्रम
९ जून : अंबाबाईला घागरा चोली परिधान.
११ जून : नागरिकांकड़ून जूना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दारात आंदोलन व श्रीपूजकांवर गुन्हा नोंद.
१४ जून : श्रीपूजक- नागरिक समन्वय बैठकीची मागणी
१५ जून : समन्वय बैठकीला श्रीपूजकांचा नकार
१६ जून : शााहू महाराजांच्या वटहूकूमानुसार पूजारी सरकारी नोकर : डॉ। सुभाष देसाई
१६ जून : शाहू महाराजांच्या वटहूकूमाचा तथाकथित म्हणून अवमान
१७ जून : अंबाबाई मंदिर पूजारी हटाओ मागणी संदर्भात बैठक
१८ जून : अंबाबाईला साकडे
२१ जून : जिल्हाधिकाºयांना निवेदन
२२ जून : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक, श्रीपूजक अजित ठाणेकर यांना मारहाण
२२ जून : पूजारी हटाओ मागणीवर निर्णयासाठी जिल्हाधिकाºयांपुढे सुनावणीचा निर्णय
२३ जून : ठाणेकर पितापूत्रांना अंबाबाई मंदिर प्रवेश बंदी : जिल्हा-पोलीस प्रशाासनाचा निर्णय
२५ जून : महालक्ष्मी एक्सप्रेसचे अंबाबाई एक्सप्रेस नामांतर
२५ जून : अजित ठाणेकर यांचा माफीनामा
२८ जून : संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांना धमकीचे पत्र
३ जूलै : पूजारी हटाओचा जिल्हा परिषदेचा ठराव
५ जूलै : पूजारी हटाओसंबंधी पहिली सुनावणी संघर्ष समितीकडून दोन हजार पानी पूरावे
१९ जूलै : श्रीपूजकांचे म्हणणे सादर
२० जूलै : महापालिकेत पूजारी हटाओ ठराव मंजूर
२० जूलै : देवस्थान समितीचे म्हणणे सादर
२२ जूलै : सुनावणी प्रक्रिया विरोधात श्रीपूजक गजानन मुनिश्वर न्यायालयात
२५ जूलै : न्यायालयात संघर्ष समितीचाही दावा
१ आॅगस्ट : आमदार राजेश क्षिरसागर यांच्याकडून लक्षवेधी प्रश्नासंबंधी बैठक
७ आॅगस्ट : न्यायालयीन प्रक्रियेत देवस्थान समिती त्रयस्थ पक्षकार म्हणून दाखल

Web Title: Pagari priest here at Ambabai temple in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.