पान -१ साठी ..‘गोकुळ’साठी ‘ए. वाय.’, शौमिका महाडिक, अरुण नरके यांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:53+5:302021-04-02T04:25:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) गुरुवारी अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) गुरुवारी अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिक अमल महाडिक, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, आदींनी १९३ अर्ज दाखल केले. २१ जागांसाठी तब्बल ४८२ अर्ज आले असून, सोमवारी (दि. ५) करवीर प्रातांधिकारी कार्यालयात छाननी होणार आहे.
‘गोकुळ’साठी २५ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. शासकीय सुट्या वगळता पाच दिवसांत तब्बल ४८२ अर्ज दाखल झाले. गुरुवारी अखेरच्या दिवशी १९३ अर्ज दाखल झाले असून, यामध्ये ए. वाय. पाटील, शौमिका महाडिक, अरुण नरके, जयवंतराव शिंपी, धनाजीराव देसाई, ‘करवीर’चे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, मुकुंद देसाई, उमेश भोईटे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील, जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह कृ. पाटील, अर्चना ए. पाटील, भारती डोंगळे, अभिजित तायशेटे, त्याचबरोबर दिवंगत नेते श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू इंद्रजित बोंद्रे, अंजना रेडेकर, माजी संचालक दिलीप पाटील, गायत्रीदेवी नंदकिशोर सूर्यवंशी, नितीन जांभळे, विश्वासराव इंगवले यांनी अर्ज दाखल केले; तर आमदार राजेश पाटील, नविद मुश्रीफ यांनी पुन्हा अर्ज दाखल केले.
दृष्टिक्षेपात ‘गोकुळ’ची निवडणूक - संघाची उलाढाल - २४५५ कोटी
मतदार- ३६५०
संचालक संख्या - २१
दाखल अर्ज - ४८२
छाननी- ५ एप्रिल
मतदान- २ मे
मतमोजणी- ४ मे
सत्तारूढ आघाडी- आमदार पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक
विरोधी आघाडी- पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू आघाडी.