कोल्हापूरात अभाविपने जाळला पाकिस्तानचा राष्ट्रध्वज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:58 PM2019-02-15T12:58:46+5:302019-02-15T13:10:24+5:30
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील ताफ्यावर गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कोल्हापूरात शुक्रवारी ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ११. ३० च्या सुमारास पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून या घटनेचा तीव्र निषेध केला. कार्यकर्त्यांसोबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही यावेळी पाकिस्तान मुदार्बादच्या घोषणा दिल्या.
कोल्हापूर : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील ताफ्यावर गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कोल्हापूरात शुक्रवारी ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ११. ३० च्या सुमारास पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून या घटनेचा तीव्र निषेध केला. कार्यकर्त्यांसोबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही यावेळी पाकिस्तान मुदार्बादच्या घोषणा दिल्या.
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. कोल्हापूरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. विविध संघटनांनी या घटनेचा निषेध केला. शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
अभाविपचे महानगर मंत्री सोहम कुरहाडे, जिल्हा संयोजक श्रीनिवास सूर्यवंशी, आकाश हटकर, साधना वैराळे, मिहीर महाजन, महेश चौगुले आदि कार्यकर्ते शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर जमले आणि त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनीही सहभागी झाले होते.