महाराणी छत्रपती ताराराणींचा राजवाडा दीपोत्सवाने ३१ डिसेंबर रोजी उजळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:21 AM2020-12-23T04:21:05+5:302020-12-23T04:21:05+5:30
पन्हाळा : सरत्या वर्षाला निरोप देताना करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या राजवाड्यासह शिवमंदिर आणि राजवाड्यातील पुरातन देव्हारा राष्ट्रीय क्षत्रिय ...
पन्हाळा : सरत्या वर्षाला निरोप देताना करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या राजवाड्यासह शिवमंदिर आणि राजवाड्यातील पुरातन देव्हारा राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद व राजधानी पन्हाळा ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहयोगातून ३१ डिसेंबर रोजी दीपोत्सवाने उजळणार आहे. दीपोत्सवाने छत्रपती ताराराणींच्या स्मृती प्रथमच जागविल्या जाणार आहेत. यात राजवाडा पणत्यांनी, फुलांनी सजणार असून यावेळी इतिहास प्रसिद्ध ताराराणींच्या जीवनावर लिहिलेल्या लेखिका सुवर्णाताई निंबाळकर, मोहिते घराण्याचे वंशज हे सामील होणार असल्याने काही जुन्या स्मृतींना उजाळा मिळणार आहे. राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद, मराठा रियासत आणि पन्हाळ्यावरील स्थानिक इतिहासप्रेमी यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराराणी यांनी वयाच्या २५ व्या वर्षी थोड्याफार सैनिकांना घेऊन औरंगजेबाबरोबर सात वर्षे युद्ध केले व त्यानंतर छत्रपती ताराराणींचे पन्हाळगड मुख्य ठिकाण राहिले. पन्हाळगडाला राजधानीचा दर्जा दिला.
भावी पिढीला त्यांचा इतिहास कळावा या उद्देशाने हा दिपोत्सव होणार असुन छ. संभाजीराजे व शाहुमहाराज या दिपोत्सवासाठी उपस्थीत राहणार आहेत ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ११ वाजे पर्यंत हा दिपोत्सव कार्यक्रम होणार आहे