पालिका कर्मचाऱ्यांचे थाळी बजाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:33 AM2020-12-30T04:33:06+5:302020-12-30T04:33:06+5:30
पेठवडगाव : अन्यत्र काम करण्याऱ्या सफाई कामगारांना मूळ ठिकाणी पाठवावे, सेवा ज्येष्ठतेनुसार मुकादम नेमा, बदली कामगारांची व्यवस्था करा. कार्यालयीन ...
पेठवडगाव : अन्यत्र काम करण्याऱ्या सफाई कामगारांना मूळ ठिकाणी पाठवावे, सेवा ज्येष्ठतेनुसार मुकादम नेमा, बदली कामगारांची व्यवस्था करा. कार्यालयीन अधीक्षक, स्वच्छता विभागांच्या पर्यवेक्षक यांनी कामचुकार करीत असल्यामुळे निलंबित करावे, आदी प्रमुख मागण्यांसाठी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ संलग्न
चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा थाळी बजाओ करण्यात आले. या आंदोलनास विविध संघटनानी पाठिंबा दिला; मात्र लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली.
आज, सोमवारी सकाळी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर घोषणा देत पालिकेसमोर आले. यावेळी संघटक सचिव सुधाकर पिसे यांनी कर्मचाऱ्यांची भूमिका मांडली.
यावेळी थाळी बजाओ करीत आता एकच नारा अधिकाऱ्यांना निलंबित करा, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांशी जातिभेद करणाऱ्याचा धिक्कार असो, कंपोस्ट कर्मचारी अधिकारी झालाच कसा यांची चौकशी झालीच पाहिजे, आदी घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास कर निरीक्षक स्वप्निल रानगे, पूनम पाटील आदींसह अन्य काही कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले. पुढील सोमवारपर्यंत मागण्यांची पूर्तता न झाल्यास बोंब मारो आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी अमित कांबळे, सुरेंद्र पोवार, गजानन धनवडे, पांडुरंग मुंदाळे, बाळासाहेब मुसळे, आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ : 1.पेठवडगाव : वडगाव नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा दुसरा टप्पा थाळी बजाओ करीत घोषणा दिल्या. यावेळी सुधाकर पिसे, अमित कांबळे, सुरेंद्र पोवार, गजानन धनवडे, पांडुरंग मुंदाळे, बाळासाहेब मुसळे, आदी सहभागी झाले होते.