कोल्हापूरच्या नृत्यांगनांचा तिरुपतीमध्ये पदन्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2015 12:22 AM2015-10-10T00:22:19+5:302015-10-10T00:33:36+5:30
डान्स फेस्टिव्हल : कविता नायर यांच्या गु्रप डान्सचे यश
कोल्हापूर : येथील ‘नर्थना स्कूल आॅफ डान्स’च्या शिक्षिका कविता मनोज नायर यांच्या ग्रुपने तिरूपती येथील नृत्यांगनांच्या भरतनाट्यम्मध्ये कोल्हापूरचा वेगळा ठसा उमटविला. तिरूपती येथे ‘श्रीवारी, कल्पश्री, साउथ इंडिया डान्स फेस्टिव्हल २०१५’चे आयोजन केले होते. कविता नायर यांच्या गु्रपने ‘मार्तंड स्तुती,’ ‘स्वागतम् कृष्णा’- कृष्णजीवनावर आधारित नृत्य-नाटक व ‘भाग्यद लक्ष्मी बारम्मा’- लक्ष्मीस्तुती ही नृत्ये या फेस्टिव्हलमध्ये सादर केली. नायर यांच्याबरोबर कीर्तना मनोज नायर, नंदिता मनोज नायर, सात्त्विका सत्येंद्र वेरणेकर, गायत्री बिपीनचंद्र जिरगे, आयुष्का प्रवीण नष्टे, सिद्धी उमेश प्रभू, कामाक्षी सचिन शानभाग यांचा सहभाग होता. या नृत्यांगनांना चषक, प्रमाणपत्र व शाल, श्रीफळ देण्यात आले. या फेस्टिव्हलमध्ये बंगलोर, चेन्नई, वारंगळ, हाँगकाँग, आदी ठिकाणी नृत्यांगनांनी सहभाग घेतला. कविता नायर यांनी ‘चाइल्ड डेव्हलपमेंट’ या विषयावर पोस्ट-ग्रॅज्युएशन केले आहे. १९९९ मध्ये त्यांनी ‘नर्थना स्कूल आॅफ डान्स’ची स्थापना केली. गुरू चोडामणी राव, के. अडय्यार लक्ष्मण, गुरू पद्मनी रवी, प्रकाश अय्यर यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, कविता नायर यांचा गु्रप कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर येथे शनिवार दि. १७ आॅक्टोबर रोजी ही सर्व नृत्ये सायंकाळी सहा वाजता सादर करणार आहे.