आजरा, भूदरगडमधील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 06:37 PM2021-02-10T18:37:26+5:302021-02-10T18:38:53+5:30
collector Kolhapur- महसूल जत्रा उपक्रमातंर्गत जिल्ह्यात पाणंद रस्ते अतिक्रमण मोहीमेने आता गती पकडली आहे. आजरा आणि भूदरगडमधील १०५ गावांच्या कामांची सुरुवात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पिंपळगाव ता. भूदरगड येथून बुधवारी केली. जेसीबी चालकांना स्वत: सुचना देत तात्काळ कामे सुरु करण्यासही त्यांनी सांगितले. या कामाचा दोन तालुक्यातील ६ हजार ५९ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
कोल्हापूर: महसूल जत्रा उपक्रमातंर्गत जिल्ह्यात पाणंद रस्ते अतिक्रमण मोहीमेने आता गती पकडली आहे. आजरा आणि भूदरगडमधील १०५ गावांच्या कामांची सुरुवात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पिंपळगाव ता. भूदरगड येथून बुधवारी केली. जेसीबी चालकांना स्वत: सुचना देत तात्काळ कामे सुरु करण्यासही त्यांनी सांगितले. या कामाचा दोन तालुक्यातील ६ हजार ५९ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
भूदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथील कामत पाणंदचे काम स्वत: जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना देसाई यांनी ग्रामस्थांनी सामंजस्याने आणि सर्वसंमतीने पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि या कामात सहकार्य करावे, असे आवाहन केले.
स्वागत विद्याधर परीट यांनी केले. सरपंच विश्वनाथ कुंभार यांनी प्रास्तविक केले. यावेळी भुदरगड उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार अश्विनी वरुटे, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी आबिटकर, सरपंच विश्वनाथ कुंभार, उपसरपंच उदय मिसाळ, पंचायत समिती माजी सभापती स्नेहल परीट, मंडळ अधिकारी रामदास लांब, तलाठी दयानंद कांबळे, विलास चव्हाण, सी. एच. चौगुले, अरुण पाटील, माजी सभापती जगदीश पाटील, ग्रामसेवक बोडके माजी सरपंच बाळासाहेब खतकर, चंद्रकांत शेवाळे, अशोक पाटील, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व कर्मचारी, गावातील सर्व महिला बचत गटाचे पदाधिकारी व सदस्य सर्व तरुण मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.