शेतीत अद्ययावतपणा आणायचा असेल तर पाणंदी सुधारणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:25 AM2021-04-01T04:25:13+5:302021-04-01T04:25:13+5:30
कौलव (ता.राधानगरी) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या पाणंदीवजा रस्त्याच्या शुभारंभप्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी तंटामुक्त अध्यक्ष विजय पाटील होते. ...
कौलव (ता.राधानगरी) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या पाणंदीवजा रस्त्याच्या शुभारंभप्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी तंटामुक्त अध्यक्ष विजय पाटील होते.
निंबाळकर पुढे म्हणाल्या, अजूनही जुने हेवे-दावे उकरून काढत शेतकऱ्यांमध्ये आडवा आणि जिरवा हे सूत्र सर्रास सुरू आहे. त्याचा त्रास सर्वांना होत असतो, ऊस असो किंवा अन्य पीक एक-एक किलोमीटर शीर वाहतूक करून बाहेर काढावे लागते. यामध्ये वेळ व पैसा वाया जातो इतकेच नव्हेतर इच्छा असूनही मनासारखी मशागत करता येत नाही म्हणून सर्वांनी एकत्र येऊन सामंजस्यपणे मार्ग काढणे भविष्यात फायद्याचे ठरणार आहे. काही अडचण आल्यास आम्हाला बोलवा, आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन मार्ग काढू, असे आश्वासन निंबाळकर यांनी दिले.
यावेळी सर्कल संदेश कदम, तलाठी सौ. एस. एम. मोरये, कोतवाल आनंदा गुरव, सरपंच सौ. सविता चरापले त्यांचे सर्व सदस्य, ग्रामविकासाधिकारी पी. एस. कांबळे, पोलीस पाटील डी. एस. कांबळे, दीपक चरापले आदींसह शेतकरी उपस्थित होते.