‘नमामी पंचगंगे’अंतर्गत पंचगंगेची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 05:22 PM2019-06-12T17:22:06+5:302019-06-12T17:24:07+5:30

‘नमामी पंचगंगे’ या उपक्रमा अंतर्गत पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी आयोजित महाश्रमदानास गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महानगरपालिकेच्या वतीने ही मोहीम सकाळी साडेसहा ते ११ या वेळेत राजाराम बंधारा तसेच पंचगंगा घाटावर व रंकाळा तलाव या ठिकाणी राबविण्यात आली.

Panchaganga cleanliness under 'Namami Panchgange' | ‘नमामी पंचगंगे’अंतर्गत पंचगंगेची स्वच्छता

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनातर्फे आयोजित केलेल्या ‘नमामी पंचगंगे’अंतर्गत स्वच्छता मोहिमेत भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक सहभागी झाले होते.

Next
ठळक मुद्दे‘नमामी पंचगंगे’अंतर्गत पंचगंगेची स्वच्छतालोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांसह नागरिकांचा सहभाग

कोल्हापूर : ‘नमामी पंचगंगे’ या उपक्रमा अंतर्गत पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी आयोजित महाश्रमदानास गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महानगरपालिकेच्या वतीने ही मोहीम सकाळी साडेसहा ते ११ या वेळेत राजाराम बंधारा तसेच पंचगंगा घाटावर व रंकाळा तलाव या ठिकाणी राबविण्यात आली.

यावेळी एक डंपर राजाराम बंधारा व एक डंपर रंकाळा तलाव येथे कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेचा प्रारंभ महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजाराम बंधारा येथील पंचगंगा घाट येथे करण्यात आला.

रंकाळा तलावामधून जुना वाशी नाका व रंकाळा तलाव पिछाडीस दोन जे. सी. बी., एक पोकलँन्ड, एक डोजर, पाच ट्रॅक्टर व एका डंपरच्या साहाय्याने गाळ काढण्याचे काम गेले १५ दिवस सुरू आहे. या ठिकाणी आजअखेर एकूण १५00 ट्रॉली व डंपर गाळ काढण्यात आला.

यावेळी शिक्षण सभापती अशोक जाधव, नगरसेवक डॉ. संदीप नेजदार, मोहन सालपे, सुभाष बुचडे, नगरसेविका माधुरी लाड, ऋतुराज पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाकडील कर्मचारी व ऋतुराज फौंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर रंकाळा येथे मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर रचनाकार नारायण भोसले, अजय कोराणे, प्राथमिक शिक्षण विभागाकडील कर्मचारी व गांधी मैदान विभागीय कार्यालयाकडील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंचगंगा घाट झाला चकाचक

पंचगंगा घाटावर आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत भाजप ताराराणी आघाडीचे नगरसेवक सहभागी झाले होते. सुमारे दोन तास झालेल्या या मोहिमेमुळे शहरातील प्रमुख असलेला हा घाट अगदी चकाचक झाला.

भाजप आघाडी गटनेता विजय सूर्यवंशी, ताराराणी गटनेते सत्यजित कदम, ताराराणी विभागीय कार्यालय प्रभाग समिती सभापती राजसिंह शेळके, माजी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, नगरसेवक ईश्वर परमार, शेखर कुसाळे, माधवी गवंडी, विजयसिंह खाडे-पाटील, वैभव माने, सुनील मोहिते, आरोग्य विभागाकडील मुकादम अरविंद कांबळे व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 

 

Web Title: Panchaganga cleanliness under 'Namami Panchgange'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.