कोल्हापुरात पंचगंगा काठी छठपूजा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:04 PM2017-10-27T13:04:31+5:302017-10-27T13:10:46+5:30
मावळत्या सूर्याची विधिवत पद्धतीने पूजा करून उत्तर भारतीय बांधवांनी गुरुवारी सायंकाळी पंचगंगा नदीघाटावर छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. व्रतस्थ महिलांनी नदीपात्रात उभे राहून सूर्याला नैवेद्य दाखवून त्याची पूजा केली.
कोल्हापूर , दि. २७ : मावळत्या सूर्याची विधिवत पद्धतीने पूजा करून उत्तर भारतीय बांधवांनी गुरुवारी सायंकाळी पंचगंगा नदीघाटावर छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. व्रतस्थ महिलांनी नदीपात्रात उभे राहून सूर्याला नैवेद्य दाखवून त्याची पूजा केली.
राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघातर्फे छठपूजेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान आज, शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता पंचगंगा नदीवर या छठपूजेची सांगता होणार आहे.
दीपावली सणानंतर सहाव्या दिवशी छठपूजेला सुरुवात होते.
छठपर्वात नदीच्या पाण्यामध्ये उभे राहून व्रती सूर्याचे ध्यान करीत अर्घ्य देतात. यानिमित्त पंचगंगा नदीघाटावर उसाची पूजा उभारली होती. गहू, तूप, गूळ यांपासून तयार केलेला ढकुआ पदार्थांचा नैवेद्य व पूजेसाठी पाच फळे आणली होती.
यावेळी नदीच्या पाण्यात उभे राहून व्रतींनी सूर्याचे ध्यान केले. छठव्रतीमध्ये अनुराधा मिश्रा, शांती टी. राय, मुन्नी देवीसिंग, निकी जितेंद्र मिश्रा, जितेंद्र रामबच्चन मिश्रा, उपदेश सिंह, सुजितकुमार मिश्रा, रामसागर मिश्रा यांचा सहभाग होता.
यावेळी संघाचे कार्याध्यक्ष ओम नारायण मिश्रा, निरंजन झा, टी. राय, प्रमोद जयस्वाल, कामेश्वर मिश्रा, अरविंंद मिश्रा, ललन कुमार, नरेंद्र झा, विजय मिश्रा, शंभुनाथ मिश्रा, जितेंद्र झा, सुजित झा, राजीव पाठक (सर्व कोल्हापूर), अशोक कुमार श्रीवास्तव, विजय मंडल, प्रकाश रंजन (इचलकरंजी) व नेर्ली, तामगाव, कागल, राजेंद्रनगर, सम्राटनगर, मंगळवार पेठ, फुलेवाडी, कसबा बावडा येथील दोन हजारांहून अधिक उत्तर भारतीय बांधव उपस्थित होते.राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघातर्फे कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर गुरुवारी सायंकाळी छठपूूजेचे आयोजन केले होते. यावेळी पंचगंगा नदीपात्रात महिलांनी सूर्याची विधिवत पद्धतीने पूजा केली.