पंचगंगा नदी धोकापातळीकडे, इशारा पातळी ओलांडली, ‘राधानगरी’चे चार दरवाजे खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 03:22 PM2019-08-01T15:22:23+5:302019-08-01T15:25:03+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारीही पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे, मात्र, बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले होऊन त्यांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. पाचवा दरवाजाही उघडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे पुराच्या पाण्याची फूग जिल्ह्यात सर्वत्र पसरलेली आहे.

Panchaganga River rises, alert level crosses, four doors of Radhanagari open | पंचगंगा नदी धोकापातळीकडे, इशारा पातळी ओलांडली, ‘राधानगरी’चे चार दरवाजे खुले

पंचगंगा नदी धोकापातळीकडे, इशारा पातळी ओलांडली, ‘राधानगरी’चे चार दरवाजे खुले

googlenewsNext
ठळक मुद्देपंचगंगा नदी धोकापातळीकडे, इशारा पातळी ओलांडली‘राधानगरी’चे चार दरवाजे खुले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारीही पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे, मात्र, बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले होऊन त्यांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. पाचवा दरवाजाही उघडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे पुराच्या पाण्याची फूग जिल्ह्यात सर्वत्र पसरलेली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १५४.५0 मिमी इतका पाऊस पडला आहे तर गडहिंग्लज तालुक्यात सर्वात कमी १३.४३ मिमी पाऊस झाला आहे.

गेले दोन ते तीन दिवस जिल्ह्यात धुवाधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस असल्याने व धरणातून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेने ४१.७ फुटांची इशारा पातळी ओलांडत धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे.

चांदोली धरणातून विसर्ग सुरू सांगली: सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची सीमारेषा असलेल्या वारणा नदीवरील चांदोली धरणातून आज-गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाच्या चारही वक्राकार दरवाजातून हा विसर्ग होत आहे. धरण नव्वद टक्के भरले असून चांदोलीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा सलग सहा दिवस जोर आहे. वारणा नदीला पूर आला आहे. आता पाणी सोडण्यात आल्याने पुराची वाढणार आहे.

पावसाचा जोर जरी कमी असला तरी धरणातून विसर्ग सुरू असल्याने पुराच्या पाण्याची फूग कायम राहणार आहे. ८१ बंधारे पाण्याखाली गेल्याने जिल्ह्याची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. इतर जिल्हा मार्ग २१, ग्रामीण मार्ग २४ असे ४५ मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली असून, यापैकी नऊ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे खंडित झाली आहे.

बर्की लघुपाटबंधारे योजनेच्या परिसरातही पावसाचे प्रमाण जास्त आहे. पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या रुई येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयावरील पाण्याची धोका पातळी ७० फुटापर्यंत वाढली आहे. तसेच वडणगे पोवार पाणंद रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. कसबा बावडा ते शिये रोड या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने बंद करण्यात आली आहे. शिरोली एमआयडीसीचे पोलीस आणि बावडा बाजूला शाहूपुरी पोलीसांनी वाहतूक बंद केली आहे.

प्रयाग तीर्थक्षेत्र पुराच्या पाण्यात

कोल्हापूर जिल्ह्याची भाग्यदायिनी असलेल्या पंचगंगा नदीला जेथे कुंभी, कासारी, तुळसी आणि भोगावती या नद्या तसेच सरस्वती या उपनदीचा संगम होतो, त्या प्रयाग तीर्थक्षेत्र पुराच्या पाण्याने वेढलेले आहे. येथील पुरातन दत्त मंदिर तसेच गणेश मंदिर पाण्यात आहॆ. या पाण्यामुळे प्रयाग ते वरणगे पाडळी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. 

चांदोली धरणातून विसर्ग सुरू

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची सीमारेषा असलेल्या वारणा नदीवरील चांदोली धरणातून आज-गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाच्या चारही वक्राकार दरवाजातून हा विसर्ग होत आहे. धरण नव्वद टक्के भरले असून चांदोलीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा सलग सहा दिवस जोर आहे. वारणा नदीला पूर आला आहे. आता पाणी सोडण्यात आल्याने पुराची वाढणार आहे.

गगनबावडा येथे वाहतूक बंद

लोंघे जवळ पाणी वाढत असून सद्यस्थितीला पन्नास टक्के पाणी रस्त्यावर आलेले आहे. यामुळे कोल्हापूर ते गगनबावडा या मुख्य रस्त्याची वाहतूक बंद झाली आहे. कोल्हापूरकडे येणारी वाहतूक गगनबावडा येथे बंद करण्यात आली आहे. तर गांधीनगर-चिंचवड रस्ता ,चिंचवड फाट्याच्या पुढे बंद झाला आहे, मात्र, चिंचवड मुडशिंगी मार्गे वाहतूक सुरू आहे.

राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळीही ४१ फूट १0 इंच इतकी आहे. जिल्ह्यातील एकुण ८३ बंधारे पाण्याखाली आहेत तसेच कोल्हापूर शहरातील सुताररवाडा येथील चार कुटुंबातील २३ जणांचे चित्रदुर्ग मठात स्थलांतर करण्यात आले आहे बालींगा पुलाचे ठिकाणी पुराचे पाणी मच्छापर्यंत आले आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीस बंद केला आहे. खोची येथील दुधगांव बंधाºयावरही पाणी वाढले असून आपत्ती व्यवस्थापनाने बॅरिकेटींग केले आहे. याशिवाय डवडे लाटवडे पुल पाण्याखाली गेला आहे.

सावधानतेचा इशारा

वारणा धरणातील जलाशयाची पाणी पातळी ६२६.९० मी. इतकी झाली आहे. धरण परिसरात अतिवृष्टी होत असून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी बारा वाजता २५00 क्युसेक्स इतका विसर्ग धरणाच्या सांडव्यावरुन नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने, नदीकाठच्या सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. यासाठी सर्व स्तरांवर सावधानतेबाबत इशारा देण्यात आल्याची माहिती वारणावती वारणा पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी टी. एस. धामणकर यांनी दिली आहे.

राधानगरीतून ७११२ घनफूट जलविसर्ग

राधानगरी धरण मंगळवारी (दि. ३०) रात्री भरल्यानंतर बुधवारी सकाळपासून क्रमांक तीन, पाच व सहा असे तीन तर गुरुवारी चार क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे. त्यांतून प्रतिसेकंद प्रतिसेकंद ७११२ घनफूट जलविसर्ग भोगावती नदीत सुरू असल्याने या नदीचे पाणी विस्तीर्ण भागात पसरले आहे.

आकडेवारी पुढीलप्रमाणे-

हातकणंगले- ४0.३८ मिमी एकूण ४३४.७९ मिमी, शिरोळ- ३७.७१ मिमी एकूण ३२७ मिमी, पन्हाळा- ६८.२९ एकूण १0८८.१४, शाहूवाडी- ७३.६७ मिमी एकूण १४८९.१७, राधानगरी- ८१.५0 मिमी एकूण १४१0.८३ मिमी, गगनबावडा- १५४.५0 मिमी एकूण ३२२८ मिमी, करवीर- ६७.९१ मिमी एकूण ८७६.0९ मिमी, कागल- ६0.१४ मिमी एकूण ८५0.५७ मिमी, गडहिंग्लज-१३.४३ मिमी एकूण ५७५.२९ मिमी, भुदरगड- ४५.४0 मिमी एकूण ११२२.२0 मिमी, आजरा- ४४ मिमी एकूण १४१६.२५ मिमी, चंदगड- २९.५0 मिमी एकूण १३७९ मिमी इतका पाऊस झाला आहे.

मगरी काठाबाहेर येण्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा

कृष्णा, पंचगंगा आणि वारणा या नद्यांची पाणी पातळी वाढली असून प्रवाह देखील तीव्र आहे. त्यामुळे मगरी नदी बाहेर येण्याची दाट शक्यता आहे तरी काठावरील ग्रामस्थांनी मगर दिसल्यास मारण्याचा किंवा तिला डिवचण्याचा प्रयत्न न करता त्वरित यांच्याशी वनविभाग किंवा वाईल्डलाईफ कॉंझर्वेशन अँड रेस्क्यू सोसायटी, महाराष्ट्र यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Panchaganga River rises, alert level crosses, four doors of Radhanagari open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.