भगवान बाहुबलींच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:16 AM2018-02-19T00:16:55+5:302018-02-19T00:17:09+5:30
भरत शास्त्री ।
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रवणबेळगोळ (कर्नाटक) : येथील गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवामध्ये रविवारी १00८ कलशांनी मस्तकाभिषेक करण्यात आला. भट्टारक पट्टाचार्य चारुकीर्ती महाराज, १0८ वर्धमानसागर महाराज व पुष्पदंत महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
महोत्सवात देशभरातील हजारो भाविकांनी कलशांचे सवाल घेऊन उपस्थिती लावली आहे. त्यामध्ये रविवारी एक हजाराहून अधिक भाविकांनी सकाळी ८.३०वाजता जलाभिषेक व त्यानंतर अखंड पंचामृत अभिषेक दुपारी दोन वाजेपर्यंत केला. त्यानंतर भाविकांना मूर्तीच्या दर्शनासाठी सोडण्यात आले. कलशधारकांच्या केशरी वस्त्रांनी संपूर्ण मंदिर परिसर केशरिया रंगात न्हाऊन गेला होता. अशाच प्रकारचा पंचामृत अभिषेक दि. २६ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर काही दिवस जलाभिषेकाने होत राहणार आहे. दरम्यान, चंद्रगिरी पर्वतावरील मंदिर व १0८ चिन्मयसागर महाराजांचे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. सोहळ्यासाठी सरिता जैन, जिनेंद्र जैन, सतीशचंद जैन, सुरेश पाटील, विनोद दोड्डनावर, जयकुमार जैन, महावीर गंगवाल, प्रमोद जैन, राकेश सेठी प्रयत्न करीत आहेत.
दान रक्कम लोकहिताच्या कामासाठी वापरण्यात येणार असल्याचे चारुकीर्ती महास्वामी यांनी सांगितले. स्वच्छतेचे काम सांगली, बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यांतील संघटना सन्मती संस्कार मंच यांचेकडे आहे.
पंतप्रधान आज उपस्थित राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, सोमवारी ११ वाजता येणार असून ते येथील २00 बेडच्या प्रशस्त रुग्णालयाची पायाभरणी करणार आहेत. त्याचबरोबर भगवान बाहुबली मूर्तीकडे पहाडावर जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पायºयांच्या तिसºया टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत.