नळ योजनेची वीज तोडण्यापूर्वी पंचायत समितीला माहिती द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:32+5:302021-07-10T04:17:32+5:30

गडहिंग्लज : थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी नळपाणी योजनेची वीज तोडण्यापूर्वी पंचायत समितीला माहिती द्यावी, अशी सूचना गटविकास शरद मगर ...

The Panchayat Samiti should be informed before disconnecting the power supply of the plumbing scheme | नळ योजनेची वीज तोडण्यापूर्वी पंचायत समितीला माहिती द्यावी

नळ योजनेची वीज तोडण्यापूर्वी पंचायत समितीला माहिती द्यावी

Next

गडहिंग्लज : थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी नळपाणी योजनेची वीज तोडण्यापूर्वी पंचायत समितीला माहिती द्यावी, अशी सूचना गटविकास शरद मगर यांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना दिली.

थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी वीज तोडल्यामुळे नळ पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे समन्वयाने मार्ग काढण्यासाठी पंचायत समितीला माहिती मिळावी, अशी मागणी विठ्ठल पाटील यांनी केली होती. त्यानुसार मगर यांनी ही सूचना केली.

तनवडी येथे तलाठी सज्जा असतानाही खमलेहट्टीला चावडी इमारत कशी मंजूर झाली? असा सवाल पाटील यांनी विचारला. परंतु, हा विषय पंचायत समितीच्या अखत्यारीत येत नसल्याचे मगर यांनी स्पष्ट केले.

सभेला विद्याधर गुरबे, जयश्री तेली यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख उपस्थितीत होते.

Web Title: The Panchayat Samiti should be informed before disconnecting the power supply of the plumbing scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.