‘पंचगंगा’ पुन्हा पात्रात

By admin | Published: July 18, 2016 01:04 AM2016-07-18T01:04:17+5:302016-07-18T01:09:50+5:30

जिल्ह्यात रिमझिम : गगनबावड्यात ०६.५० मि.मी.; राधानगरी धरण ८३ टक्के भरले

'Panchganga' again in the boat | ‘पंचगंगा’ पुन्हा पात्रात

‘पंचगंगा’ पुन्हा पात्रात

Next

कोल्हापूर : सलग चौथ्या दिवशी पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीची पातळी ७ फूट ४ इंचांनी उतरून गेल्या अनेक दिवसांपासून पात्राबाहेर असलेले पाणी रविवारी पुन्हा पात्रात गेले. उघडीप असली तरी जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू राहिली. राधानगरी धरणसाठ्यात वाढ होऊन ते ८३ टक्के भरले असून, राजाराम बंधाऱ्याची पातळी ३१ फूट २ इंच इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ६.५० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने नदीच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन ते गेल्या चार दिवसांपासून शहरातील नदी घाट परिसरातील कै. संजयसिंह गायकवाड यांच्या पुतळ्यासमोर होते. परंतु रविवारी पावसाचा जोर कमी राहिल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत घट होऊन ते पुन्हा पात्रात गेले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
शहरासह जिल्ह्णात दिवसभर पावसाने उघडीप दिली असली तरी रिमझिम सुरूच राहिली. ढगाळ वातावरणाने हवेत गारवा जाणवत होता. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी राहिला असला तरी धरणसाठ्यात मात्र वाढ झाली. राधानगरी धरण ८३ टक्के भरले आहे. त्या खालोखाल वारणा ६६ टक्के, तुळशी ५६, दूधगंगा ४४, कुंभी व कासारी ८१, जांबरे ९७, कडवी व घटप्रभा १०० टक्के इतका धरणसाठा आहे. शनिवारी पाण्याखाली असलेल्या २१ बंधाऱ्यांपैकी ९ बंधारे रविवारी वाहतुकीस खुले झाले असून, अद्याप पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे ७ बंधारे आणि भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे हे ४ बंधारे व वारणा नदीवरील तांदूळवाडी असे १२ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्णात गेल्या चोवीस तासांत २१.१९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
४हातकणंगले - ०.०० ४शिरोळ - ०.०० ४पन्हाळा - ०१.५७ ४शाहूवाडी - ०५.५० ४राधानगरी - १.१७ ४गगनबावडा - ०६.५० ४करवीर - ०.०९ ४कागल - ०.२८ ४गडहिंग्लज - ०.०० ४भुदरगड - १.०० ४आजरा - २.२५ ४चंदगड - २.८३.

Web Title: 'Panchganga' again in the boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.