कोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठावरील ३९ गावे लावतात प्रदुषणाला हातभार, प्रदूषणमुक्तीचे आदेश कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 07:20 PM2022-12-13T19:20:32+5:302022-12-13T19:21:05+5:30

छोटे- मोठे नाले नदीत मिसळून प्रदुषणाची तीव्रता वाढली

Panchganga pollution in Kolhapur due to 39 villages on river bank | कोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठावरील ३९ गावे लावतात प्रदुषणाला हातभार, प्रदूषणमुक्तीचे आदेश कागदावरच

कोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठावरील ३९ गावे लावतात प्रदुषणाला हातभार, प्रदूषणमुक्तीचे आदेश कागदावरच

googlenewsNext

संदीप आडनाईक

कोल्हापूर : पंचगंगा नदीचा उगम सह्याद्री पर्वतातच होतो. पंचगंगा नदीखोरे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक कणा आहे. या खोऱ्यात कोल्हापूर, गांधीनगर, इचलकरंजी, हातकणंगले यासारखी नागरी आणि औद्योगिक केंद्रे येतात. तसेच या खोऱ्याच्या एकूण १२५ कि.मी लांबी मध्ये एकूण १७४ गावेही येतात. या नदीकाठावरील ३९ गावे प्रदुषणाला हातभार लावतात. 

अनेक गावांत कावीळ, गॅस्ट्रोसारख्या जलजन्य साथीसोबतच मासे, कासवांसारखे जलचर मृत्यूमुखी पडले आहेत. इतकेच काय इचलकरंजीतील चाळीस व्यक्तींनाही जीवानिशी जावे लागले आहे.

विद्यापीठाचे सर्वेक्षण

शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाने नदीकाठावरील १७४ गावांचे सर्वेक्षण करुन प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या घटकांचे विश्लेषण केले. जलपर्णी वाढल्यामुळे पाणी दूषित झाले आहे. रासायनिक पाणी, मळीयुक्त सांडपाणी नदीत मिसळते. तसेच दुधाळी, जयंती, बापट कॅम्प, लाईन बाजारसह छोटे- मोठे नाले नदीत मिसळून प्रदुषणाची तीव्रता वाढवली आहे.

प्रदूषणमुक्तीचे आदेश कागदावरच

न्यायालय, हरित लवाद आणि पर्यावरण मंत्र्यांनी अनेकदा पंचगंगेच्या प्रदूषण मुक्तीचे आदेश दिले. इशारे दिले, पण, ते कागदावर राहत असल्याने पंचगंगा प्रदूषणयुक्तच राहिली. या नदीत गावागावातून मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी नदीकाठावरील ३९ गावांमध्ये सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी निधीही दिला आहे. गेल्या काही वर्षांत गणेशमूर्तींचे विसर्जन नदीत झाले नाही. काही ठिकाणी पाळीव जनावरांना नदीत सोडण्यावर बंदी आहे. पण या बाबी किरकोळ आहेत.

  • पंचगंगा खोऱ्यातील गावे : १७४
  • प्रदूषणास कारणीभूत ठरणारी गावे : ३९
  • कायमस्वरूपी सांडपाणी मिसळणारी गावे : २१
  • अंशत: सांडपाणी मिसळणारी गावे : १५
  • हंगामी प्रदूषण करणारी गावे : १३५


बारमाही प्रदूषण करणारी गावे २१
करवीर : बालिंगे, गांधीनगर, हळदी, हणमंतवाडी, कांडगाव, कोपार्डे, कोथळी, कुडित्रे, नागदेववाडी, परिते, शिंगणापूर, उचगाव, वाकरे, वळीवडे, वरणगे
हातकणंगले : चंदूर, हातकणंगले, कबनूर, रुई, शिरोली, तिळवणी
शिरोळ : नांदणी, नृसिंहवाडी

मध्यम प्रदूषण करणारी गावे : ८
करवीर : कळंबे तर्फ ठाणे, मोरेवाडी, पाचगाव, पाडळी बुद्रुक, वडणगे
हातकणंगले : पट्टणकोडोली, रुकडी
शिरोळ : शिरदवाड

थेट प्रदूषण न करणारी गावे : ५
करवीर : आंबेवाडी, चिंचवाड, प्रयाग चिखली, वसगडे, शिरोळ : शिरढोण

Web Title: Panchganga pollution in Kolhapur due to 39 villages on river bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.