वसईकर, मनवर, आवारे, कोळी यांना ‘पंडित आवळीकर काव्य पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:26 AM2021-01-16T04:26:23+5:302021-01-16T04:26:23+5:30

विद्यापीठाने मराठी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक पंडित आवळीकर यांच्या नावे ‘पंडित आवळीकर काव्य ...

Pandit Avalikar Poetry Award to Vasaikar, Manvar, Aware, Koli | वसईकर, मनवर, आवारे, कोळी यांना ‘पंडित आवळीकर काव्य पुरस्कार’

वसईकर, मनवर, आवारे, कोळी यांना ‘पंडित आवळीकर काव्य पुरस्कार’

googlenewsNext

विद्यापीठाने मराठी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक पंडित आवळीकर यांच्या नावे ‘पंडित आवळीकर काव्य पुरस्कार’ देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आवळीकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीमधून हा पुरस्कार दोन वर्षातून एकदा देण्यात येणार आहे. सन २०१४ ते २०२० या कालावधीतील एकूण चार काव्यसंग्रहांना एकाचवेळी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सन २०१४-१५साठी गणेश वसईकर यांच्या ‘मधल्या मध्ये’ या काव्यसंग्रहास, सन २०१६-१७ साठी दिनकर मनवर यांच्या ‘अजूनही बरंच काही’, सन २०१८-१९साठी सुप्रिया आवारे यांच्या ‘न बांधल्या जाणाऱ्या घरात’ आणि सन २०२०साठी नामदेव कोळी यांच्या ‘काळोखाच्या कविता’ या कवितासंग्रहांना पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. नंदकुमार मोरे यांनी काम पाहिले.

फोटो (१४०१२०२१-कोल-गणेश वसईकर (पुरस्कार), दिनकर मनवर (पुरस्कार), सुप्रिया आवारे (पुरस्कार), नामदेव कोळी (पुरस्कार)

Web Title: Pandit Avalikar Poetry Award to Vasaikar, Manvar, Aware, Koli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.