‘गोकुळ’साठी सतेज पाटील, मुश्रीफ, मंडलिक यांचे पॅनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:14 AM2021-02-05T07:14:49+5:302021-02-05T07:14:49+5:30

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार, नाकर्तेपणा लपविण्यासाठी सभा गुंडाळली. सत्ताधाऱ्यांना याचे उत्तर द्यावेच लागणार आहे. आता न्यायालयात नाही तर ...

Panel of Satej Patil, Mushrif, Mandlik for 'Gokul' | ‘गोकुळ’साठी सतेज पाटील, मुश्रीफ, मंडलिक यांचे पॅनल

‘गोकुळ’साठी सतेज पाटील, मुश्रीफ, मंडलिक यांचे पॅनल

Next

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार, नाकर्तेपणा लपविण्यासाठी सभा गुंडाळली. सत्ताधाऱ्यांना याचे उत्तर द्यावेच लागणार आहे. आता न्यायालयात नाही तर जनतेच्या कोर्टातच न्याय मागू, अशी आक्रमक भूमिका ‘गोकुळ बचाव आघाडी’ने घेतली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली पॅनल करून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

बुधवारी ‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभा झाल्याने विरोधी गोकुळ बचाव आघाडीने पत्रकार बैठकीत भूमिका मांडली. बाबासाहेब देवकर, सदाशिव चरापले, किरणसिंह पाटील, प्रदीप पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची कुंडली मांडली. यावेळी दिलीप पाटील, बाबासाहेब चौगुले, शशिकांत खोत, अमित कांबळे, महादेव नरके, मोहन सालपे, सचिन घोरपडे, इंद्रजित बोंद्रे उपस्थित होते.

चौकट ०१

शंकर पाटलांच्या कथेची आठवण

‘गोकुळ’ची सभा पाहिल्यावर शंकर पाटलांच्या कथेची आठवण आल्याचे सांगताना सदाशिव चरापले म्हणाले, गावात सभा झाली नाही असे ग्रामस्थ सांगत असतात; पण ग्रामविकास अधिकारी मात्र ती झाल्याचे सांगतो, हे सिद्ध करण्यासाठी खर्चाची राेजनिशी दाखवतोे, तशीच अवस्था ‘गोकुळ’ची झाली आहे. गेल्या वर्षी सभा झालीच नाही, तरी प्रोसीडिंगमध्ये खर्च दाखविला गेला.

चौकट ०२

यूथ बँकेतील पैशाचे काय?

यूथ बँकेत ‘गोकुळ’चे ५ कोटी १३ हजार अडकले आहेत. बँकेची १२ वेळा तपासणी होऊनही तिला परवाना मिळणार नसल्याचे सत्य माहीत असतानाही अरुण नरके यांनी पैसे काढले नाहीत, यावरून ‘गोकुळ’विषयी त्यांना किती आस्था आहे, ते स्पष्ट होते, असा आरोप सदाशिव चरापले यांनी केला.

‘गोकुळ बचाव’ने केलेले आरोप

दूध संकलन २० लाख लिटर होणार म्हणून १०० कोटी खर्च केले; पण ११ लाख लिटरच संकलन आहे, मग एवढा खर्च कशासाठी ?

ज्येष्ठ संचालकांनीच संघाला खड्ड्यात घातले

गेल्या सभेला गाजलेले विषय टाळून लेखापरीक्षकांकडून ‘गोकुळ’च्या भ्रष्टाचारावर पांघरूण.

बल्क कुलर १०० मंजूर केले; पण १९ कार्यान्वित; मग बाकीचे गेले कुठे?

प्रक्रिया खर्च वाढवून ७६ कोटी २८ लाख हडप

Web Title: Panel of Satej Patil, Mushrif, Mandlik for 'Gokul'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.