प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठी पन्हाळगडाला वाढतेय पसंती, ऐतिहासिक वेशभूषेला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 12:35 PM2022-12-30T12:35:03+5:302022-12-30T12:35:48+5:30

फोटोसेशन होत असता पुरातत्त्वचे कर्मचारी व फोटोग्राफर यांच्यामध्ये वाद

Panhal Fort is growing in popularity for pre wedding photography | प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठी पन्हाळगडाला वाढतेय पसंती, ऐतिहासिक वेशभूषेला प्राधान्य

प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठी पन्हाळगडाला वाढतेय पसंती, ऐतिहासिक वेशभूषेला प्राधान्य

googlenewsNext

नितीन भगवान   

पन्हाळा : पारंपरिक पद्धतीने विवाह करणे आता नव्या पिढीला रुचत नसल्याने काहीतरी हटके आणि वेगळे करण्याचे ठरते. यातील विवाहपूर्व (प्री-वेडिंग) ऐतिहासिक वेशभूषेत छायाचित्रणासाठी पन्हाळ्यावर गर्दी होऊ लागली आहे.

कोण मावळ्याच्या भुमिकेत तर कोण राजांच्या भुमिकेत पहायला मिळत आहे. रुढी-परंपरेनुसार प्रत्येक धर्माची विवाह करण्याची पद्धती वेगळी असली तरी यात सर्वांत महत्त्वाचे ठरते ते छायाचित्रण, हेसुद्धा पारंपरिकच. नव्या पिढीला आपल्या होणाऱ्या जोडीदाराबरोबर बोलता यावे, ओळख व्हावी, स्वभाव कळावा या हेतूने विवाहपूर्वी एकमेकांना भेटता यावे यादृष्टीने नवा फंडा निर्माण झाला. याचा परिणाम म्हणजे लग्नापूर्वी छायाचित्रण केले जाते. मात्र यावेळी काहीतरी हटके करण्याच्या नादात छोटे-मोठे अपघाताची शक्यता असते. 

वादाचे प्रसंग

पन्हाळ्यावर ऐतिहासिक इमारती भरपूर आहेत. या ठिकाणी पुरातत्त्व विभाग छायाचित्र अथवा छायाचित्रणासाठी कसलीही परवानगी देत नाही. या ठिकाणी हे प्री-वेडिंग फोटोसाठी गर्दी होते. विषेशत: तीन दरवाजा, अंधारबाव व नायकिणीचा सज्जा या ठिकाणी हे फोटोसेशन होत असता पुरातत्त्वचे कर्मचारी व फोटोग्राफर यांच्यामध्ये वाद होतात.

पन्हाळा पोलिसांनी याविषयी लक्ष घालणे जरुरीचे आहे. ऐतिहासिक, पौराणिक व निसर्गाने नटलेल्या या पन्हाळ्यावर आता आणखीन एक नवी ओळख निर्माण होते आहे. प्री-वेडिंग फोटोसेशन पण यासाठी लागणाऱ्या परवानग्या अथवा त्याची नोंद असावी इतकीच माफक अपेक्षा आहे. 

परवानगी आवश्यक

पन्हाळ्यावर छायाचित्रण करताना पुसाटी बुरुज, तानपीर परिसर हा भाग वनविभागाकडे आहे. याठिकाणी प्री-वेडिंगचे फोटो घ्यावयाचे असतील तर वन विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे वनरक्षक व्ही. टी. दाते यांनी सांगितले.  

Web Title: Panhal Fort is growing in popularity for pre wedding photography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.