पन्हाळागडावर होणार वातावरणातील बदलांचा अभ्यास, देशातील तिसरे केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 12:38 PM2022-03-15T12:38:12+5:302022-03-15T13:19:58+5:30

वैश्विक आणि सौरकिरणांमुळे वातावरणातील वरच्या स्तरांमध्ये होणाऱ्या बदल, घडामोडींचा अभ्यास शिवाजी विद्यापीठामध्ये होणार आहे. त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे विद्यापीठाच्या पन्हाळा अवकाश संशोधन केंद्रामध्ये बसविण्यात येणार

Panhalagad will be the third center in the country to study climate change | पन्हाळागडावर होणार वातावरणातील बदलांचा अभ्यास, देशातील तिसरे केंद्र

पन्हाळागडावर होणार वातावरणातील बदलांचा अभ्यास, देशातील तिसरे केंद्र

googlenewsNext

कोल्हापूर : वैश्विक आणि सौरकिरणांमुळे वातावरणातील वरच्या स्तरांमध्ये होणाऱ्या बदल, घडामोडींचा अभ्यास शिवाजी विद्यापीठामध्ये होणार आहे. त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे विद्यापीठाच्या पन्हाळा अवकाश संशोधन केंद्रामध्ये बसविण्यात येणार आहेत. अहमदाबाद, हैदराबादनंतर अशी सुविधा असणारे कोल्हापूर हे देशातील तिसरे केंद्र ठरणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र सरकारच्या अंतरिक्ष विभागांतर्गत येणाऱ्या भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा, अहमदाबाद आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यात सन २०२१ मध्ये वातावरणातील मध्यांबर, दलांबर,उष्मांबर या जमिनीपासून ५० किलोमीटर ते ५०० किलोमीटर इतक्या अंतरामध्ये उत्सर्जित होणाऱ्या एकाधिक तरंगलांबीच्या प्रकाश किरणांचा अभ्यास करण्यासाठी सामंजस्य करार झाला.

याअंतर्गत अहमदाबाद भौतिक अनुसंधान प्रयोगशाळेकडून सुमारे एक कोटी किमतीची उपकरणे शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्रामध्ये बसवण्यात येणार आहेत. ही उपकरणे बसविण्यासाठी लागणाऱ्या वेधशाळेच्या निर्मितीसाठी विद्यापीठाकडून सुमारे २२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. या उपकरणांमध्ये सीसीडी-आधारित मल्टीवेव्हलेंथ एअरग्लो फोटोमीटर आणि पीआरएल- एअरग्लो इन्फ्रारेड स्पेक्ट्रोग्राफ या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा समावेश असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के आणि पदार्थविज्ञान अधिविभागाचे डॉ. राजीव व्हटकर यांनी सांगितले.

मूलभूत संशोधन सुविधेत वाढ

अहमदाबाद, हैदराबाद, कोल्हापूर केंद्रांद्वारे एकत्रितरीत्या संशोधन करून वैश्विक, सौर किरणांमुळे वातावरणातील वरच्या स्तरांमध्ये होणाऱ्या घडामोडी, बदलांचा सविस्तर अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे विद्यापीठात अवकाश संशोधनासाठी लागणाऱ्या मूलभूत संशोधन सुविधेमध्ये वाढ होणार असून याचा उपयोग संशोधक विद्यार्थ्यांना होणार असल्याचे डॉ. व्हटकर यांनी सांगितले.

Web Title: Panhalagad will be the third center in the country to study climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.