महेत मोकाट कुत्र्यांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:27 AM2021-08-13T04:27:13+5:302021-08-13T04:27:13+5:30
सावरवाडी : महे ( ता . करवीर ) येथे मोकाट कुत्र्यांची चांगलीच दहशत पसरविली आहे. शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर ही ...
सावरवाडी : महे ( ता . करवीर ) येथे मोकाट कुत्र्यांची चांगलीच दहशत पसरविली आहे. शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर ही कुत्री हल्ला करत असल्याने शेतकरीही चिंतेत आहेत. महेतील ढोकमाळ परिसरात शेतकऱ्याच्या जनावरांच्या शेडमधील लहाने रेडकू, व कोंबड्यांवर ६०ते ७० मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
महे गावात शेती व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो . ढोकमाळ परिसरात शेतीमध्ये शेतकऱ्यांनी दुभत्या जनावरांचे गोठे उभारले आहेत. गेल्या सहा महिन्यापासून येथे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. बाळू जरग, रवींद्र पाटील यांच्या गोठ्यात शिरून कुत्र्यांनी रेडकांवर हल्ला केला. तसेच इंगवले यांच्या चिकन सेंटरच्या दुकानात तारा उचकटून शंभर कोबड्यांवर ही हल्ला केला.
कोट : महेगावात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर धाऊन जाण्याचे प्रकार घडत आहेत. जिल्हा प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
निवास पाटील, माजी उपसरपंच महे.