पानिपत रणसंग्राम मराठ्यांसाठी प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:26 AM2021-01-16T04:26:18+5:302021-01-16T04:26:18+5:30
कोल्हापूर : पानिपतच्या युद्धात जरी मराठ्यांचा पराभव झाला तरी पानिपतचा रणसंग्राम मराठ्यांसाठी प्रेरणादायी शौर्यगाथा ठरली, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास ...
कोल्हापूर : पानिपतच्या युद्धात जरी मराठ्यांचा पराभव झाला तरी पानिपतचा रणसंग्राम मराठ्यांसाठी प्रेरणादायी शौर्यगाथा ठरली, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डाॅ. वसंतराव मोरे यांनी केले. मावळा कोल्हापूरतर्फे गुरुवारी पानिपत मराठा शौर्य दिनानिमित्त शाहू स्टेडियम परिसरातील स्वामी विवेकानंद आश्रम आध्यात्मिक केंद्रात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
डाॅ. मोरे म्हणाले, अब्दालीने खैबर खिंडीतून हिंदुस्थानवर स्वाऱ्या केल्या. अब्दालीने एकूण पाच स्वाऱ्या केल्या. पाचव्या स्वारीत पानिपतचे घनघोर युद्ध झाले. या युद्धात अब्दाली जिंकला; पण त्याने मराठ्यांच्या पराक्रमाची स्तुती केली. या युद्धानंतर त्याने पुन्हा स्वारी करण्याचे धाडस केले नाही. प्रास्ताविक मावळा कोल्हापूरचे विनोद साळोखे यांनी केले. हा पराक्रम आजच्या पिढीला कळावा, या उद्देशाने हा शौर्य दिन साजरा केला जातो, असे स्पष्ट केले. यावेळी उमेश पोवार, युवराज पाटील, ओंकार नलवडे, सचिन दामुगडे, संतोष हेबाळे, अमोल गायकवाड आदी उपस्थित होते.
फोटो : १४०१२०२१-कोल-मराठा
ओळी : कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद आश्रम आध्यात्मिक केंद्रात पानिपत मराठा शौर्य दिनानिमित्त गुरुवारी सायंकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक डाॅ. वसंतराव मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विनोद साळोखे उपस्थित होते.